अहमदनगर | नगर सह्याद्री महिलांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाल्यास त्या ठसा उमटवणारे काम करतात. मीनाताई मुनोत यांनी अनेक वर्षे एक प्रतिष्ठित...
महिलांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाल्यास त्या ठसा उमटवणारे काम करतात. मीनाताई मुनोत यांनी अनेक वर्षे एक प्रतिष्ठित दैनिक यशस्वीपणे चालवून उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य दाखविले तसेच मर्चंट बँकेच्या संचालक म्हणून त्या सहकारी बँकींग क्षेत्रात मोठे योगदान देत आहेत. त्यांची या प्रतिष्ठित बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठे यश मिळविले. त्यांचे कार्य समस्त महिला वर्गाची मान उंचावणारे आहे, असे प्रतिपादन पुष्पा गांधी यांनी केले.
अहमदनगर मर्चंटस बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मीनाताई मुनोत यांची संचालक पदी चांगल्या मतांनी निवड झाली आहे. या निवडीबद्दल मुनोत यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निर्मला बोरा, श्यामा गुगळे, जया गांधी, छाया बोरा आदी उपस्थित होत्या.मीनाताई मुनोत म्हणाल्या की, हस्तीमलजी मुनोत यांच्या नेतृत्वाखालील मर्चंटस बँक सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या बँकेच्या संचालक मंडळावर दीर्घकाळ संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. एका प्रतिष्ठित आर्थिक संस्थेच्या वाटचालीत योगदान देता येणे नेहमीच समाधान देणारे असते. सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास दर्शवत आपल्यासह संपूर्ण पॅनलला विजयी केले. आज झालेला सत्कार आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.
COMMENTS