पारनेरच्या रस्त्यांसाठी ६२ कोटी २५ लाख रूपयांचा निधी आणला खेचून पारनेर | नगर सह्याद्री राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतरही आ. न...
पारनेरच्या रस्त्यांसाठी ६२ कोटी २५ लाख रूपयांचा निधी आणला खेचून
पारनेर | नगर सह्याद्री
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतरही आ. नीलेश लंके यांनी आपला करीष्मा दाखवत यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मतदारसंघासाठी तब्बल ८४ कोटी २५ लाख रूपयांचा निधी खेचून आणला आहे. .राज्याच्या बजेटमधून ६२ कोटी २५ लाख तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसर्या टप्प्यातून २२ कोटींचा निधी मिळवत आ.निलेश लंके यांनी विकास कामात आपण मागे नसल्याचे दाखवून दिले आहे.
अर्थ व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून विविध कामांसाठी मंजुर झालेला निधी: पारनेर तालुयातील देवीभोयरे फाटा, सुपा, सारोळा रस्ता ५ कोटी ४० लक्ष, प्रमुख जिल्हा मार्ग ५० ते हिवरे कोरडा, तिखोल, पिंपळगांव तुर्क, कान्हूरपठार, पिंपळगांव रोठा, खंडोबाची वाडी ते तालुका हद्द रस्ता ,५ कोटी. रेनवडी, चोंंभूत, वडनेर, निघोज, पिंपरीजलसेन, गांजीभोयरे, पानोली, गटेवाडी, निघोज ते कॅनॉल पिंपरीजलसेनकडे ४ कोटी, रेनवडी, चोंंभूत, वडनेर, निघोज, पिंपरीजलसेन, गांजीभोयरे, पानोली, गटेवाडी रस्ता ४ कोटी, राज्य मार्ग ६९ ते वाळवणे पिंपरीगवळी, रांजणगांव, भोेयरे गांगर्डा, पळवे बुद्रुक, ४ कोटी. म्हसे खुर्द ते राळेगण थेरपाळ, हकीकतपुर, राळेगणसिध्दी, जातेगांव, पळवे बुद्रुक, कडूस, भोयरे गांगर्डा, रूईछत्रपती, वाळवणे ते राज्य मार्ग ६९ ला मिळणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग २ कोटी ५० लक्ष.
प्रमुख जिल्हा मार्ग ५० ते गोरेगांव, डिकसळ, लोणीहवेली, हंगा, शहंजापुर, सुपा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा करणे २ कोटी, वाडेगव्हाण, कळमकरवाडी, पाडळीकडूस रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा करणे, २ कोटी. प्रमुख जिल्हा मार्ग ५० ते हिवरे कोरडा, तिखोल, पिंपळगांव तुर्क, कान्हूरपठार, पिंपळगांवरोठा, खंडोबाची वाडी, गारखिंडी ते तालुका हद्द रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा करणे, २ कोटी ५ लक्ष.प्रमुख जिल्हा मार्ग ५० ते हिवरे कोरडा, तिखोल, पिंपळगांव तुर्क, कान्हूरपठार, पिंपळगांवरोठा, खंडोबाची वाडी, गारखिंडी ते तालुका हद्द रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा करणे (स्थळ:कान्हूर ते गारगुंडी फाटा) २ कोटी.
राज्य मार्ग २२२ ते वासुंदे, वनकुटे रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा करणे (स्थळ वडगांव सावताळ ते वनकुटे) २ कोटी. म्हसे खुर्द, राळेगण थेरपाळ, हकीकतपुर, राळेगणसिध्दी, जातेगांव, पळवे बुदु्रक, कडूस, भोयरे गांगर्डा, रूईछत्रपती, वाळवणे ते राज्य मार्ग ६९ ला जोडणारा रस्ता सुधारणा करणे (स्थळ पिंपळनेर ते राळेगणसिध्दी ते जातेगांव ) ४ कोटी २५लक्ष. रेनवडी, चोंंभूत, वडनेर, निघोज, पिंपरी जलसेन, गांजीभोयरे, पानोली, गटेवाडी,प्रमुख राज्य मार्ग ५ रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा करणे (स्थळ गटेवाडी ते पुणे रस्ता) ४ कोटी २० लक्ष. पारनेर सुपा रस्ता राज्य मार्ग ६९ ते वडनेर हवेली, राळेगणसिध्दी प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा करणे (स्थळ कन्हेर ओहळ ते वडनेर हवेली) १ कोटी ५५ लक्ष. भाळवणी ते निमगांव घाणा, निमगांव वाघा राज्य मार्ग ५८ सुधारणा करणे (स्थळ भाळवणी ते खारे कर्जुने) ३ कोटी ५० लक्ष .भाळवणी ते निमगांव घाणा, निमगांव वाघा राज्य मार्ग ५८ सुधारणा करणे (स्थळ भाळवणी ते खारे कर्जुने) ३ कोटी ५० लक्ष. निंबळक, चास, खंडाळा, वाळुुंज, नारायणडोह रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १ सुधारणा करणे (स्थळ चास ते निमगांव वाघा)३ कोटी. राज्य मार्ग ५८ ते खारे कर्जुने, हिंगणगांव, निमगांव वाघा, केडगांव, बुरूडगांव, वाकोडी, वाळुंज ते राज्य मार्ग ५८ सुधारणा करणे (स्थळ नवनाथ विद्यालय ते निमगांव वाघा) २ कोटी १९ लाख. राज्य मार्ग ५८ ते खारे कर्जुने, हिंगणगांव, निमगांव वाघा, केडगांव, बुरूडगांव,वाकोडी, वाळुंज ते राज्य मार्ग ५८ सुधारणा करणे (स्थळ वाकोडी ते सिना नदी) २ कोटी.
निंबळक, चास, खंडाळा, वाळुंज, नारायणडोह रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा करणे (स्थळ खंडाळा ते बाबुर्डी)२ कोटी २० लक्ष मांजरसुुंबा, पिंपळगांव माळवी, विळद, इसळक ते राज्य मार्ग ५८, निंबळक, हिंगणगांव ते जखणगांव प्रमुख जिल्हा मार्ग, वार्षीक देखभाल करणे (स्थळ नगर मनमाड महामार्ग ते गवळीवाडा) १ कोटी २५ लक्ष.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन ४ रस्त्यांसाठी२२ कोटींचा निधी आमदार निलेश लंकेमुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २, आशीयाई विकास बँक अर्थसहायय अंतर्गत २५ कि. मी. च्या ४ रस्त्यांना २२ कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. यामध्ये कोहकडी ते म्हसे खुर्द, गाडीलगांव ते निघोज १३ कि मी रस्ता सुधारणा करणे १२ कोटी २५ लक्ष. जवक मळा, रांजणगांव मशिद ते तालुका हद्द उख्खलगांवकडे जाणारा ५ कि मी रस्ता सुधारणा करणे, ३ कोटी ७२ लक्ष भोयरे खुर्द ते चास ४ कि मी रस्ता सुधारणा करणे ३ कोटी १ लाख. शिंगवे ते बांबोरी ३ कि मी रस्ता सुधारणा करणे, ३ कोटी २ लाख निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.
COMMENTS