निघोज | नगर सह्याद्री महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती विकास अभियान उमेद अंतर्गत तयार करण्यात आलेल्या बचत गटांना ग्रामपंचायत सदस्या सोनाली संदीप...
महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती विकास अभियान उमेद अंतर्गत तयार करण्यात आलेल्या बचत गटांना ग्रामपंचायत सदस्या सोनाली संदीप सालके यांच्या विशेष प्रयत्नातून जवळा येथील ३५ बचत गटांना दीड लाख रुपये प्रति गट प्रमाणे कर्ज मंजूर करण्यात आले. महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक प्रवीण थोरात, वैशाली पठारे, कॅशियर, सहकारी कैलास शिंगाडे यांच्या वतीने यावेळी कर्ज वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली सालके यांनी केले.मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र बँकेने महिलांवर विश्वास ठेवून व्यावसायिक उन्नतीसाठी आर्थिक सहकार्य केले आहे. त्याची परतफेड आपण वेळेत करून विश्वासार्हता टिकवणे हे आपले कर्तव्य आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने केलेल्या सहकार्याबद्दल महिला क्रांतिज्योती ग्राम संघ सदैव ऋणी राहील. येणार्या काळामध्ये आम्ही अधिकाधिक महिला बँकेच्या सोबत जोडण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ग्रामसंघाला लवकरच ऑफिससाठी ग्रामपंचायती कडून जागा देण्यात येईल, याची ग्वाही सालके यांच्या कडून देण्यात आली. बँकेसोबत आपले व्यवहार अधिका अधिक चांगले ठेवून आपले सिबिल स्ट्राँग ठेवण्यासाठी महिलांनी प्रयत्न करावेत, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रवीण थोरात म्हणाले की, बँकेला देखील चांगल्या ग्राहकांची आवश्यकता आहे. येणार्या काळामध्ये महिलांच्या पाठीशी बँक भक्कमपणे उभी राहील आणि दोन वर्षात नियमित परतफेड केल्यास दुप्पट कर्ज देण्याचे देखील आश्वासन यावेळी दिले. यावेळी बँकेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.यावेळी बँकेच्या वैशाली पठारे म्हणाल्या, महिलांनी कर्जाचा वापर घरखर्चासाठी न करता व्यवसायिक कारणासाठी करून उत्पन्न वाढवावे हा देखील मोलाचा सल्ला दिला. यावेळी ग्रा.सदस्या मीनाताई शिंगाडे, ग्रा.प.सदस्या बेबी गवळी, सीआरपी भारती खुपटे, सुवर्णा सोमवंशी ,रूपाली गवळी, आरती पठारे, लता सोमवंशी, प्रियंका रासकर, सविता घोलप, ज्योती रासकर, अनुराधा गवळी, रेश्मा शेख, मंदा एकनाथ पठारे, महिला तसेच सर्व बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव , सदस्य देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन छाया सालके यांनी केले तर कविता खुपटे यांनी आभार मानले.
COMMENTS