अहमदनगर | नगर सह्याद्री येथील पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कमचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी किशोर गांगर्डे यांची तर उपाध्यक्षपदी ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
येथील पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कमचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी किशोर गांगर्डे यांची तर उपाध्यक्षपदी दीपक वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या संस्थेची नुकतीच निवडणुक होवुन विकास पॅनलचे २१ पैकी १९ उमेदवार विजयी झाले होते. विरोधी सहकार पॅनलला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले होते. तब्बल ७ वर्षांंनतर या संस्थेत सत्तांतर झाले आहे. आज अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संचालक मंडळाने किशोर गांगर्डे यांची अध्यक्षपदी व वाघ यांची उपाध्यक्षपदी न्निवड केली. दत्तात्रय आवारी, सुरेश ढोमसे, अशोक राशीनकर देविदास शेटे,गणेश कवडे पाटील,रविंद्र यादव, संदिप शेरकर, संतोष जायभाय, संदिप पवार , जगिदश वाघ, किशोर गांगर्डे, अरविंद वाव्हळ, अमृता पोळ ,संभाजी निमसे, विशाल सरोदे,अर्चना गायकवाड, महेश भावसार, किशोर सांगळे हे नवनिर्वाचित संचालक यावेळी उपस्थित होते.
COMMENTS