अमेरिका । नगर सह्याद्री - अमेरिकेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने एका महिलेची क्रुरपणे हत्या करुन तिचे काळीज शिजवून खाल...
अमेरिका । नगर सह्याद्री -
अमेरिकेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने एका महिलेची क्रुरपणे हत्या करुन तिचे काळीज शिजवून खाल्ले आहे. अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यात ही घटना घडली आहे. लॉरेन्स पॉल अँडरसन असं हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पॉल अँडरसनने एका चार वर्षाच्या मुलासह तिघांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. द इंडिपेंडंटच्या माहितीनुसार, आरोपीने हे सर्व खून 2021 मध्ये केले आहे. यासाठी त्याला अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दुसऱ्या प्रकरणात, तो 2021 मध्ये तुरुंगातून सुटला आणि सुटका झाल्यानंतर महिनाभरातच कमी कालावधीत त्याने हे तीन खून केले आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर काही आठवड्यांनंतर त्याने अँड्रिया ब्लँकेनशिपची हत्या केली आणि नंतर तिचे काळीज बाहेर काढले आहे.
त्यानंतर तो मावशीच्या घरी गेला आणि तिथे बटाटे घालून ते काळीज शिवजून खाल्ल्याची माहिती आहे. त्यानंतर त्याने 67 वर्षीय लिओन आणि तिची 4 वर्षांची नात केओस येट्स यांचीही हत्या केली आहे. हत्येपूर्वी त्याने तयार केलेलं अन्न खायला देण्याचा प्रयत्नही केला होता.
अँडरसनला अंमली पदार्थांच्या प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा झाली होती. त्यापैकी त्याने फक्त तीन वर्षांची शिक्षा भोगली होती. त्याला ओक्लाहोमाचे गव्हर्नर केविन स्टिट यांनी शिक्षा दिली आहे. त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याच्या तपासादरम्यान अँडरसनला चुकून शिक्षेच्या यादीत टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे. आता अँडरसनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
COMMENTS