चित्रपट रसिकांच्या उदंड प्रतिसादात अरुणोदय फिल्म फेस्टिवलचा समारोप अहमदनगर | नगर सह्याद्री चांगले विचार देणारे मराठी चित्रपट निर्माण होत आह...
चित्रपट रसिकांच्या उदंड प्रतिसादात अरुणोदय फिल्म फेस्टिवलचा समारोप
अहमदनगर | नगर सह्याद्रीचांगले विचार देणारे मराठी चित्रपट निर्माण होत आहेत. मात्र मराठी चित्रपटांना चांगले निर्माते मिळत नाहीत, मिळाले तर टिकत नाहीत. ही शोकांतिका आहे. यासाठीच सचिन जगताप आता मराठी कलाकारांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहेत. ते नवे कलाकार, दिग्दर्शक व निर्मात्यांना चित्रपट निर्मितीसाठी तंत्रज्ञानाचे पाठबळ देणार आहेत. त्यामुळे नगरमधून दिग्गज कलाकार, दिग्दर्शक व निर्माते तयार होतील. अरुणोदय फिल्म फेस्टीव्हल रसिकांच्या व चित्रपटांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने यशस्वी झाला आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
नगरमध्ये माजी आमदार अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला अरुणोदय फिल्म फेस्टिवलचा उत्साहात समारोप झाला. यानिमित्त चित्रपट व लघुपटांच्या विविध कॅटेगरीमध्ये ५० पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी आ.संग्राम जगताप अध्यक्षस्थानाहून बोलत होते. कार्यक्रमास महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, फेस्टिव्हल संयोजक सचिन जगताप, चित्रपट निर्माता बलभीम पठारे, दादा जगताप, ज्येष्ठ अभिनेते मोहन सैद, सिने अभिनेता पृथ्वीराज थोरात, लेखक दिग्दर्शक संकेत पावसे, सिने अभिनेत्री श्रद्धा पाटील, मराठी नाट्य परिषदेचे महानगर शाखेचे अध्यक्ष संजय लोळगे व अमोल खोले, अभिनेते मोहिनीराज गटणे, जि.प. सदस्या सुवर्णा जगताप, नगरसेविका शीतल जगताप, डॉ.शशीकांत फाटके, डॉ.वंदना फाटके, श्रेणिक शिंगवी, बाल कलाकार आरुष बेडेकर, फेस्टिव्हल डायरेटर शशीकांत नजन आदींच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
अभिनेत्री श्वेता पाटील म्हणाल्या, नगरमध्ये खूप मोठा अरुणोदय फ्लीम फेस्टिव्हल उत्सहात पार पडला आहे. सचिन जगताप यांनी पुढाकार घेऊन सुरु केलेला हा उपक्रम नव्या कलाकारांना उर्जा व व्यासपीठ देणारा आहे. बलभीम पठारे म्हणले, २५ वर्षांपूर्वी अरुण जगताप जेव्हा शहराचे नगराध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी नाट्य कलाकारांना प्रोत्साहन देत नगरपालिकेचा संघ पहिल्यांदा राज्य नाट्य स्पर्धेत उतरवला होता. तेव्हापासून जगताप कुटुंबीय सिने नाट्य क्षेत्राल पाठबळ देत आहे.यावेळी अभिनेते महेश काळे, संकेत पावसे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात सहसंयोजक समिर दाणी म्हणाले, पहिल्याच वर्षी अरुणोदय फिल्म फेस्टिवलला देशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला आहे. अनेक नावाजलेले चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी रसिकांना मिळाल्याने हजारो चित्रपट रसिकांच्या उपस्थितीने हा महोत्सव यशस्वी झाला आहे. आता दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करणार आहोत. समारोप समारंभाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. कृष्णा बेळगावकर यांनी आभार मानले. यावेळी संयोजन समितीचे संदीप बोदगे, अक्षय देशपांडे, भूषण गणूरकर, काजल गांधी, गणेश विटेकर, नितीन ढाकणे, सुभाष जाधव, प्रेरणा मुनोत आदींसह सदस्य उपस्थित होते. अरुणोदय फिल्म फेस्टीव्हलचा सविस्तर निकाल: म्युझिक व्हिडीओ कॅटेगरी- प्रथम सये मन हे, द्वितीय नारिजात व तृतीय - सोनपरी. वैयक्तीक पारितोषके बेस्ट म्युझिक डायरेटर - रशिद निंबाळकर (प्रेमाचं काळिज),बेस्ट लिरीस रायटर - रुषीकेष कवडे (जगाचा पोशिंदा), बेस्ट सिनेमॅटोग्राफर - आकाश बनकर (गं आई ), बेस्ट एडीटर- भरत सोळसे (ए मेरी लव्ह स्टोरी), बेस्ट प्रॉडशन डिझायनर - सागर जाधव (परी), बेस्ट परफॉर्मर मेल - आर्या चिल्का (ए मेरी लव्ह स्टोरी), बेस्ट परफॉर्मर फिमेल - श्वेता पाटील (व्यहम), बेस्ट कोरिओग्राफर - सये मन हे. बेस्ट अॅनिमेशन फिल्म लिलीथ क्वीन ऑफ सकुबी. वेबसिरीज कॅटेगरी, प्रथम गावरान मेवा, द्वितीय तुमच्यासाठी काय पण, तृतीय द डायरी ऑफ सायको. वैयक्तीक पारितोषके - बेस्ट डायरेटर - दीपक देशमुख (गावराण मेवा), बेस्ट सिनेमॅटोग्राफर कनाद खापर्डे (तुमच्यासाठी काय पण), बेस्ट इडीटर - प्रतिक पाटील (द डायरी ऑफ सायको),बेस्ट साउंड डिझायनर -चाणय नेहूल (तुमच्यासाठी काय पण), बेस्ट प्रॉडशन डिझायनर - अंकुश काळे ( गावरान मेवा), बेस्ट स्क्रीन रायटर नामदेव गव्हाणे व किरण बेरड (गावराण मेवा), बेस्ट अॅटर -महेश काळे (गावरान मेवा). डॉयुमेंट्री कॅटेगरी प्रथम पूर्णांगिणी, द्वितीय जस्ट फॉर सर्वाइव्ह व तृतीय दोन चाक ४३५ दिवस. वैयक्तीक पारितोषीके बेस्ट डायरेटर - कृष्णा बेलगावकर (रखुमाई), बेस्ट सिनेमॅटोग्राफर - सिध्देश दळवी, प्रतिक सोनवणे (शिमगोत्सव), बेस्ट इडीटर- अमनदीप सिंग (सत्यशोधक). शॉर्ट फिल्म्स कॅटेगरी- प्रथम रेखा, द्वितीय नवाझ तृतीय विभागून अ हाफ डे व मुंघ्यार. वैयक्तीक पारितोषिके - बेस्ट डायरेटर- विक्रम बोलगावे (महासत्ता), बेस्ट सिनेमॅटोग्राफर- रंजीत माने (भेट), बेस्ट इडीटर - महेश (ग्रॅनी), बेस्ट साउंड डिझायनर.बेस्ट प्रॉडशन डिझायनर - सुरमा, अ डे अंडर स्काय, बेस्ट स्क्रीन रायटर प्रविण खाडे (ताजमहाल), बेस्ट अॅटर मेल - हरिष बारस्कर (अंकुर), बेस्ट अॅटर फिमेल - वर्षा अष्टेकर (अंतर).
COMMENTS