उत्तर प्रदेश / नगर सह्याद्री - उत्तर प्रदेश येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. बहराइच येथे एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका चुलत भावानेच ...
उत्तर प्रदेश येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. बहराइच येथे एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका चुलत भावानेच आपल्या लहान भावाची हत्या केली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपी भावासह त्याच्या वडिलांना देखील या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नानपरा कोतवली येथील परसा या गावात २३ मार्च रोजी ही घटना घडली आहे. विवेक असं १० वर्षीय मृत मुलाचं नाव आहे. त्याचा मोठा चुलत भाऊ अनुप याने विवेकच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याची निर्घृण हत्या केली आहे. तसेच शेतामध्ये त्याचं शव फेकून दिलं. बहराइच पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी यावर विवेकच्या वडिलांशी सपर्क साधला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेकच्या वडिलांच्या तक्रारीवरून अनुप आणि त्याच्या वडलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनुपला देखील एक लहान मुलगा आहे. मात्र त्याची तब्येत सतत खराब असते. त्याला सारखी चक्कर येते.
त्यामुळे अनुप त्याला घेऊन दुसऱ्या गावातील एका मांत्रिकाकडे गेला होता. त्यावेळी त्या मांत्रिकाने मुलाच्या वयाच्या दुसऱ्या एका चांगल्या मुलाचा बळी देण्यास सांगितले. त्यामुळे अनुपने स्वत:च्याच भावाचा बळी दिला. पोलिसांनी या प्रकरणी मांत्रिक, अनुप आणि त्याच्या वडिलांना देखील अटक केली आहे.
COMMENTS