कोल्हापूर / नगर सह्याद्री - काही मालिका प्रत्यक्षात घडणाऱ्या प्रसंगांशी इतक्या मिळत्याजुळत्या असतात की, पाहून धक्का बसतो नुकतीच कोल्हापुरात...
कोल्हापूर / नगर सह्याद्री -
काही मालिका प्रत्यक्षात घडणाऱ्या प्रसंगांशी इतक्या मिळत्याजुळत्या असतात की, पाहून धक्का बसतो नुकतीच कोल्हापुरात अशीच एक घटना घडली आहे. जिथं, एका डॉक्टरच्या कृत्याने खळबळ माजली आहे. कोल्हापुरातील मुरगूड गावात ही घटना घडली असून, सध्या तिथं गावात पेन ड्राईव्ह, निनावी पत्र आणि अश्लील पोस्टरची जोरदार चर्चा सुरु आहे. सदर घटना पाहता 'देवमाणूस' या मालिकेचीच आठवण होत आहे.
कोल्हापुरात एका डॉक्टरने महिलांशी अश्लील चाळे करत त्यांचे फोटो, व्हिडीओ तयार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कहर म्हणजे हा डॉक्टर बोगस असून, त्यानं आतापर्यंत जवळपास 80 महिलांशी गैरवर्तन केल्याची बाब समोर आली आहे. या डॉक्टरच्या कृत्यांबाबत कळताच नागरिकांनी संतप्त भावनेनं शेकडे निनावी पत्र गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींना पाठवत या डॉक्टरवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. सध्या हा डॉक्टर फरार असून, उघडकीस आलेल्या प्रकारामुळं मुरगूडमध्ये संतापाची उसळली आहे.
हा कथित डॉक्टर त्याच्याकडे आलेल्या महिला रुग्णांसोबत अश्लील चाळे करत होता. या कृत्याचे व्हिडीओ त्यानं लॅपटॉपमध्ये ठेवले होते. ज्यावेळी लॅपटॉप दुरुस्तीसाठी पाठवण्यात आला तेव्हाच महिलांसोबतचे त्याचे हे व्हिडीओ व्हायरल झाले.
COMMENTS