आनंदऋषी महाराजांचे विचार समाजाला प्रेरणादायी : आ. संग्राम जगताप अहमदनगर | नगर सह्याद्री आचार्य प.पू.आनंदऋषीजी महाराजांचे विचार समाजाला प्रे...
आनंदऋषी महाराजांचे विचार समाजाला प्रेरणादायी : आ. संग्राम जगताप
अहमदनगर | नगर सह्याद्रीआचार्य प.पू.आनंदऋषीजी महाराजांचे विचार समाजाला प्रेरणादायी आहेत. नगर शहरामध्ये त्यांचे समाधीस्थळ असून, ही पावन भूमी आहे व हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशभरातून भाविक भक्त नगर नगर शहरामध्ये प.पू. आनंदऋषीजींच्या दर्शनासाठी येत असतात.देशभरात नगर शहराची ओळख विकसित शहर म्हणून व्होवी यासाठी काम करत आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आनंद धाम ते सक्कर चौक रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा मर्चंट बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती मीनाताई चोपडा, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक विपुल शेटिया, माजी नगरसेवक संजय चोपडा, अनिल पोखरणा, प्रेमराज बोथरा, अण्णासाहेब मुनोत, अमित मुथा, कमलेश भंडारी, अजय मुथा, रामनारायण मंत्री, डॉ. विजय भंडारी, अजित कर्नावट, सतीश लोढा, संजय लोढा,अजित गुगळे, किशोर गांधी, मनीष साठे, विजय कोथिंबीर, सतीश चोपडा, संजय बोरा, संतोष बोथरा, मीनाताई मुनोत, प्रमिलाताई बोरा, अनुज सोनीमडलेचा, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
जगताप पुढे म्हणाले, शहराच्या विकास कामासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आहे त्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी रस्ता काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. आनंदधाम ते सक्कर चौक रस्ता काँक्रिटीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. आचार्य प.पू. आनंदऋषीजी म.सा यांच्या संकल्पनेतील मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून समाज बांधव आज नगर शहरामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजवंतांची आरोग्यसेवा केली जाते, मर्चंट बँकेच्या माध्यमातून सलग २७ वर्ष प.पू. आनंदऋषीजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक युवक व महिला रक्तदान करत असतात. हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मर्चंट बँकेचे संस्थापक अध्यक्ष हस्तीमल मुनोत म्हणाले की, आचार्य प.पू. आनंद ऋषीजी यांच्या समाधी स्थळ परिसराचा विकास कामातून कायापालट झालेला दिसत आहे, या परिसराचे सुशोभीकरणाचे काम देखील सुरू आहे्. या शहराचे आमदार संग्राम जगताप हे सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे करतात हे कौतुकास्पद आहे. मर्चंट बँकेच्या माध्यमातूनभव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरामध्ये शेकडो नागरिक सहभाग घेऊन रक्तदान करत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती मीनाताई चोपडा यांनी केले तर आभार प्रदर्शन नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी मानले.
COMMENTS