सत्ताधारी नगरसेवक अविनाश घुले यांचा इशारा अहमदनगर | नगर सह्याद्री प्रभाग ११ मधील पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करा, अन्यथा मनपात ठिय्या आंदोल...
सत्ताधारी नगरसेवक अविनाश घुले यांचा इशारा
अहमदनगर | नगर सह्याद्रीप्रभाग ११ मधील पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करा, अन्यथा मनपात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक अविनाश घुले यांनी दिला आहे.
मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की प्रभाग ११ मधील कानडे मळा, चौधरीनगर, चैतन्य कॉलनी, पुनममोती, कोठी, झेंडीगेट, काळू बागवान गल्ली, ख्रिस्त गल्ली, निळकंठ कॉलनी, आशिर्वाद कॉलनी, अरिहंत कॉलनी, हातमपुरा, गंजबाजार, सराफ बाजार परिसरात गेल्या दीड महिन्यापासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. केव्हाही पाणी सोडण्यात येते. तसेच कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. याबाबत मी समक्ष वेळोवेळी पाणी पुरवठा विभागप्रमुख व संबंधित इंजिनिअर यांची भेट घेवून या भागातील पाणी पुरवठ्याबाबतच्या समस्या सांगितल्या आहेत. परंतु अद्यापपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. तरी सात दिवसांमध्ये वरील भागामध्ये पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास प्रभागातील नागरिकांसमवेत आयुक्तांच्या दालनामध्ये तीव्र स्वरुपाचे ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
COMMENTS