पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील गोरेश्वर पतसंस्थेला सलग ९ व्या वर्षी बँको पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सहकार क्षेत्रात मह...
पारनेर तालुक्यातील गोरेश्वर पतसंस्थेला सलग ९ व्या वर्षी बँको पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सहकार क्षेत्रात महत्वाचा समजला जाणारा व अविज पब्लिकेशन कोल्हापुर आणि गॅलसी इनमा, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय बँको पुरस्कार हा ग्रामीण विभागात १०० ते २०० कोटी ठेवी गटात तृतीय क्रमांक हा गोरेश्वर पतसंस्थेस नुकताच महाबळेश्वर येथे दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
दि. ठाणे जनता सह. बँकेचे अध्यक्ष शरद गंगाल यांचे हस्ते व बँको चे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे आणि गॅलसी इनमा चे अशोक नाईक यांचे उपस्थितीत स्वीकारताना संस्थेचे चेअरमन बाजीराव पानमंद व संचालक चंद्रभान शेलार, मंजाबापू तांबे, शिवाजी नरसाळे, राम तांबे, शंकर लष्करे, दत्तात्रय नरसाळे, शिवाजी नरसाळे (सर), आप्पा थोरात, अंबादास नरसाळे व अधिकारी वर्ग उपस्थित होते. सन २०२१ -२२ या आर्थिक वर्षासाठी तज्ञ समितीने केलेल्या मुल्यांकना नुसार गोरेश्वर पतसंस्थेची बँको ब्लु रिबन पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली होती. संस्था २०१४ पासून सलग ९ वर्ष हा पुरस्कार मिळवीत आहे. तसेच या काळात सहकार क्षेत्रातील राज्यस्तरीय अनेक महत्वाचे पुरस्कार संस्थेने मिळविलेले आहेत. संस्थेचा पारदर्शक कारभार व संस्थापक चेअरमन बाजीराव पानमंद व त्यांना असणारी संचालक मंडळाची भक्कम साथ व सर्व कर्मचारी वर्गाचे अथक परिश्रम यामुळे संस्थेची यशस्वी घोडदौड सुरु आहे. संस्था स्थापनेला २५ वर्ष पूर्ण झाले असुन रौप्य महोत्सवा -निमित्त संस्थेने वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असुन संस्थेचे कामकाज ११ शाखांच्या माध्यमातून सुरु आहे. संस्थेने नुकतीच सहकार खात्यांकडून ४ नवीन शाखांना मंजुरी घेतली असुन पारनेर तालुयातील निघोज, वडझिरे व टाकळी ढोकेश्वर आणि नगर तालुयातील कामरगाव या ठिकाणी लवकरच नवीन शाखा सुरु करण्यात येणार आहे. संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असुन नुकतीच संस्थेची संचालक मंडळ निवडणुक प्रक्रिया बिनविरोध पार पडलेली आहे. संस्था सभासदांसाठी सर्व अत्याधुनिक बँकिंग दर्जाची सेवा पुरवीत असुन मोबाईल बँकिंग, यू आर कोड स्कॅनिंग, ठढॠड, छएऋढ व खचझड सुविधा, वीजबिल भरणा व मोबाईल रिचार्ज, स्वतंत्र खऋडउ कोड यासारख्या बँकिंग दर्जाच्या सुविधा प्रदान केल्या आहेत. त्यामुळे अल्पावधीतच पारनेर तालुयातील ११ शाखांच्या माध्यमातून संस्थेने १९२ कोटी ठेवी व कर्जवाटप -१५१ कोटी तसेच सुरक्षिततेपोटी ५५ कोटीची गुंतवणूक केलेली आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक चेअरमन बाजीराव पानमंद व व्हा. चेअरमन मिराताई नरसाळे यांनी सर्व आजी माजी संचालक मंडळ, सभासद, हितचिंतक व कार्यतत्पर कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS