मुंबई - इंदोरीकर महाराज यांनी आता गौतमी पाटीलवर निशाणा साधला आहे. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र गौतमीन...
मुंबई -
इंदोरीकर महाराज यांनी आता गौतमी पाटीलवर निशाणा साधला आहे. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र गौतमीने तीन गाणे वाजवले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा होतो. 200 पोरांचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधे संरक्षण देखील दिले जात नाही, असा आरोप आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील महोत्सवात काल इंदुरीकर महाराजांनी केला आहे.
किर्तनकार इंदुरीकर महाराज हे आपल्या वेगवेगळ्या विधानांनी नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी थेट प्रसिद्ध नृत्यांगणा आणि सध्या तरुणाईमध्ये जिची मोठी क्रेझ आहे अशा गौतमी पाटीलवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. शेतकरी तुम्ही बोलायचे नाही. आम्ही रस्त्यावर कीर्तन करतो. आमचे जीवन वार्यावर. आम्हाला काय संरक्षण आहे? आम्हाला विमा नाही. जे जे लोक खरे काम करतात त्यांचा भोंग्या करायचा. तुम्ही बधिर आहे, म्हणून चाललंय सगळं. मी गेल्यावर कळेल तुम्हाला हा काय बोलत होता. असे इंदुरीकर महाराज म्हणाले.
काळ किती वाईट आला आहे. लग्नाला जायचे नाही. मौतीला जायचे नाही. कार्याला गेला नाही. आपण एखाद्या दहाव्याला गेलो पण दिसला नाही. असे लोक म्हणतात. तेव्हा दुसरा म्हणतो तो दुसर्या पार्टीत आहे. इतका काळ वाईट आला आहे. असे सांगतानाच प्रत्येकाने धर्मनिष्ठ राहा. कुणाच्याही धर्माचा अवमान करू नका. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि तुकाराम महाराज किंवा आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल कुणी मोबाईल क्लिप टाकली तर लगेच व्हायरल करू नका. चुकीची असेल तर डिलीट करा. तुकाराम महाराज आपले बाप आहे. शिवाजी महाराज आपले प्राण आहेत. त्यामुळे कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.
COMMENTS