मुंबई - गौतमी पाटीलचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. गौतमी पाटीलचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. गौतमीने कमी वेळेत आप...
मुंबई -
गौतमी पाटीलचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. गौतमी पाटीलचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. गौतमीने कमी वेळेत आपला मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी जमते.
काही वादांमुळे चर्चेत आलेल्या गौतमीने त्यानंतर मनोरंजन क्षेत्रात मोठे नाव तयार केले आहे. गौतमीने खऱ्या अर्थाने 'मार्केट जाम' केलं आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गौतमीचे वेगवेगळ्या गाण्यांवर व्हिडीओ व्हायरल होत असतात.
अनेक व्हिडीओ हे तिच्या कार्यक्रमातील असातत. गौतमीचा असाच एक व्हिडीओ तिने तिच्या अकाऊंवर शेअर केला आहे. ज्यामधे ती नऊवारी साडीत नाही तर ब्लू अँड व्हाईट ड्रेसमध्ये दिसत आहे.
'तुझा छंद लागला...' या गाण्यावरील तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर उपलब्ध आहे. गौतमी पाटीलचे अनेक फॅन पेज सध्या फेसबूक, इन्स्टाग्राम, यू्ट्युबरवर उपलब्ध आहे. या माध्यमाध्यमातून गौतमीचे अनेक डान्स व्हिडीओ तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचत असतात.
COMMENTS