पारनेर | नगर सह्याद्री पारनेर शहरातील किसान इंटरनॅशनल स्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे १२ वीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यां...
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर शहरातील किसान इंटरनॅशनल स्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे १२ वीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी या प्रवेश परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार असल्याची माहिती स्कुलचे प्राचार्य चंद्रकांत चेडे यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा दिलेल्या किसान स्कूलमधील तसेच स्कुल बाहेरील अशा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश खुला आहे. सोमवार दि. २७ मार्च पासून हे वर्ग किसानच्या कॅम्पसमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. या वर्गामध्ये मागील दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या सरावासह इतर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या संधीचा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन चेडे यांनी केले आहे. प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी ९१३००५२३८१ व ९४२३१६०१५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. किसान बहुउदेशिय संस्थेच्या किसान इंटरनॅशनल स्कुलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसई अभ्यासक्रम सर्वप्रथम उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा फायदा विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणार्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना झाला आहे. किसानमध्ये शिकलेले अनेक विद्यार्थी वैद्यकिय, अभियांत्रीकी अभ्यासक्रमासाठी निवडले गेले आहेत. ग्रामीण विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने अभ्यासात पुढे गेला पाहिजे या हेतूने स्थापना करण्यात आलेल्या किसान या संस्थेने आता ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विविध प्रवेश परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन वर्गसुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा ग्रामीण विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
COMMENTS