निघोज | नगर सह्याद्री जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू होणार असून शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्...
निघोज | नगर सह्याद्री
जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू होणार असून शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी केले आहे. बाभुळवाडे येथील नाम फाउंडेशन आणि आपलं गाव फाउंडेशन च्या सहकार्याने जल नाम प्रकल्पाचा शुभारंभ गावातील ठाकरवाडी बाभूळवाडे येथे व्ही एम आय आय पी एल चे सर्वेसर्वा उद्योगपती व्ही. एम. मातेरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी ते बोलत होते. या वेळी सरपंच वैशाली जगदाळे, भिकाजी जगदाळे, प्रमोद खणकर, रभाजी मातेरे, फाउंडेशनशचे अध्यक्ष डॉ. सुरेश खणकर, प्रमोद जगदाळे, संजय शिर्के, संतोष बोरुडे, कैलास खोडदे, श्रीराम पवार, प्रशांत जगदाळे, रजनीकांत जगदाळे, देवेंद्र जगदाळे, गंभीर केदार, संजय चिकणे, सुनील चिकणे, महादू चिकणे, सुरेश केदार इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी व्ही एम मातेरे यांनी जलसंधारण च्या कामासाठी आपल्या सी. एस. आर फंडातून रुपये ३ लाखाचा निधी दिला. तसेच जलसंधारण काम केल्यामुळे गावातील जलस्त्रोतांची पाणी पातळी वाढून गाव सुजलाम सुफलाम होईल असे त्यांनी सांगितले. सर्व ग्रामस्थांनी मातेरे यांचे भरघोस मदतीबद्दल आभार मानले. बाभूळवाडे येथे जलसंधारणाची गरज आहे तेथे हे काम लोकवर्गणीतून फक्त इंधन टाकून नाम फाउंडेशन च्या नियमानुसार चालणार आहे. जवळ जवळ १० ते १२ लाखाचे काम करण्याचा गावकर्यांचा मानस आहे. यावेळी आपलेच गाव फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश खणकर यांनी सांगितले की मातेरे यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली असून गाव पाण्याबाबत स्वयंपूर्ण कसे होईल यासाठी आपले गाव फौंडेशन, ग्रामपंचायत व ग्रामस्थ या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शासनाची जलयुक्त शिवार योजना तसेच उद्योगपती व उद्योजक या माध्यमातून मदत घेउन कार्यरत राहणार असल्याची माहिती डॉ. खणकर यांनी दिली आहे.
COMMENTS