श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने सत्कार अहमदनगर | नगर सह्याद्री जिल्ह्याची कामधेनू म्हणून जिल्हा सहकारी बँकेची ख्याती आहे. जिल्ह्यात...
श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने सत्कार
जिल्ह्याची कामधेनू म्हणून जिल्हा सहकारी बँकेची ख्याती आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांचे विविध शाखा, सोसायट्याच्या माध्यमातून आर्थिक सक्षमिकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर शेतीवर आधारित कारखाने, उद्योगांना प्रोत्साहनही बँकेच्या माध्यमातून दिले जात आहे. अशा महत्वाच्या बँकेच्या चेअरमनपदी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची झालेले निवड ही त्यांच्या नेतृत्वा गुणांची ओळख आहे. या पदाच्या माध्यमातून शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतील. त्याचबरोबर नगरच्या सहकारी क्षेत्राला उभारी देण्याचे काम करतील, असा विश्वास श्री विशाल गणेश देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी व्यक्त केला.जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, विजय कोथिंबीरे, संजय चाफे, नितीन पुंड आदि उपस्थित होते.सत्कारास उत्तर देतांना अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले म्हणाले, नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशावर सर्वांची मोठी श्रद्धा आहे. आपणही आपल्या चांगल्या कामाची सुरुवात श्री विशाल गणेशाचे आशिर्वाद घेऊनच करत असतो. सर्वांच्या सहकार्याने आपण जिल्हा बँकेत अध्यक्षपदाच्या माध्यमातून मिळालेली संधीचा उपयोगी सर्वसामान्य, शेतकरी यांच्या हिताचे निर्णय घेऊन करु. त्याचबरोबर जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातला केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त सवलती मिळविण्याचा प्रयत्न करु. या कार्यात श्री गणेशाचे आपणास सत्काररुपी आशिर्वाद मिळाले असल्याचे सांगितले.याप्रसंगी उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे यांनी अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा परिचय करुन दिला, पांडूरंग नन्नवरे यांनी आभार मानले.
COMMENTS