अन्यथा अन्न औषध प्रशासन आयुक्तांस काळे फासणार: श्रीगोंदेकरांचा इशारा श्रीगोंदा | नगर सह्याद्री श्रीगोंदा तालुयात दुध भेसळीला अन्न व औषध प्र...
अन्यथा अन्न औषध प्रशासन आयुक्तांस काळे फासणार: श्रीगोंदेकरांचा इशारा
श्रीगोंदा | नगर सह्याद्रीश्रीगोंदा तालुयात दुध भेसळीला अन्न व औषध प्रशासनाचा छुपा आर्शीवाद आहे. त्यामुळे दुधात भेसळ करणार्या टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्यांचे बिमोड करा अन्यथा अन्न औषध प्रशासनाचे आयुक्तांच्या तोंडाला कासे फासण्याचा इशारा श्रीगोद्यातील आंदोलकांनी दिला आहे
गुरुवारी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदे तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
दुध भेसळ प्रकरणी ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सहा आरोपींना अटक केली पाच जण फरार आहेत. पोलिस या गुन्ह़्याचा खोलात जाऊन तपास करीत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचे उद्योग केले आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनातील अधिकार्यांविषयी नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
आंदोलकांनी केलेल्या ठळक मागण्या अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त उमेश राजेंद्र सुर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. दूध व अन्न पदार्थ यामध्ये भेसळ करणार्या व्यक्तींना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात यावी. महाराष्ट्र विधिमंडळाने हा कायदा तातडीने करावा दूध भेसळ रॅकेट ची व्याप्ती मोठी असल्याने व राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याने सीआयडी अथवा पोलीस महासंचालक मार्फत कसून चौकशी करण्यात यावी.
श्रीगोंदा तालुयातील रॅकेट चा सबंध आष्टी-करमाळा-शिरूर-पारनेर-नगर- बारामती अशा अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे एकाच वेळी छापे टाकून रॅकेट उध्वस्त करण्यात यावे. दुध भेसळ प्रकरणातील सर्व आरोपींना किमान सहा महिने तडीपार करावे व सर्व आरोपींचे बँक खाते सील करण्यात यावेत, व दूध भेसळ करणारे सर्व चिंलिग प्लॅन्ट कायम स्वरुपी बंद करावेत.
यावेळी बाबासाहेब भोस, दत्तात्रय पानसरे, डॉ.प्रणोती जगताप, टिळक भोस बाळासाहेब नाहाटा, आदेश नागवडे, प्रा.बाळासाहेब बळे, भाऊसाहेब खेतमाळीस, सुनील वाळके, बापु गोरे, रमेश लाढणे, संजय खेतमाळीस, सतीश बोरुडे,युवराज पळसकर, वैभव मेथा, झहीर जकाते उपस्थित होते.
कडक कायदा करण्याची गरज: टिळक भोस
दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा विषय सभागृहात मांडला असून आमदार सुरेश धस यांनी सुद्धा लक्षवेधी मांडून हा प्रश्न राज्यव्यापी केला आहे. पण सरकारने दुध अन्न भेसळ करणार्यांच्या विरोधात कडक कायदा करण्याची गरज असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी व्यक्त केले.
COMMENTS