अहमदनगर | नगर सह्याद्री संभाजीनगर येथील ब्रह्मीभूत माता प्रेमानंदीनाथ महाराज यांच्या जन्मशताब्दीमहोत्सव सोहळयानिमित्त प्रोफेसर कॉलनी येथील ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
संभाजीनगर येथील ब्रह्मीभूत माता प्रेमानंदीनाथ महाराज यांच्या जन्मशताब्दीमहोत्सव सोहळयानिमित्त प्रोफेसर कॉलनी येथील रेणुका माता मंदिरात सुयोग ट्रस्टच्या वतीने त्रिदिवसीय पंचकुंडात्मक नवचंडी यागाचे आयोजन केले होते.
नवचंडी याग हा दहा जिल्हयात होणार असून याची सुरूवात नगरमधून झाली. शताब्दीपूर्ती सांगता फेब्रुवारी २०२४ मध्ये होणार आहे. यावेळी आयुध्यचंडीयागाचे आयोजन केले आहे आयुध्यचंडीयाग म्हणजे सप्तशतीचे दहा हजार पाठ व हजार पाठाचे हवन होणार आहे. पूर्णाहुतीच्या दिवशी श्री सप्तशती ग्रंथाच्या झालेल्या एका पाठाचे हवन झाले. प्रत्येक श्लोकाची आहुती देताना सर्व सहभागी यजमान मंडळींनी कृपेची अनुभूती घेतली.तीन दिवसाच्या या पंचकुंडात्मक नवचंडी यज्ञात समाजातील सर्व स्तरातील मंडळी मोठ्या भक्तीने सहभागी झाले. पन्नास जोडपी यजमान म्हणून यज्ञाला बसले होते.यावेळी हरिहर सद्गुरू शक्तिपीठाचे साधक, सुयोग ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मोहन कामथ, उपाध्यक्ष प्रा.डॉ. प्रभाकर प्रताप ,पुष्पा चिंताबर, निलिमा आपटे, रेणुका माता मंदिराचे पुजारी रत्नाकर कुलकर्णी, सविता कुलकर्णी आदीसह मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पूर्णाहुतीनंतर भगवतीमातेचा नामजागर करून आरती व पुरणपोळीचा महाप्रसादाने या त्रिदिवसीय नवचंडी यागाची सांगता झाली.
COMMENTS