श्रीगोंदा | नगर सह्याद्री मराठे व निजामाच्या सैन्यात अहमदनगर जिल्हातील खर्डा येथे झालेल्या १३ मार्च १७९५ च्या सरसेनापती दौलतराव शिंदे यांच्...
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
मराठे व निजामाच्या सैन्यात अहमदनगर जिल्हातील खर्डा येथे झालेल्या १३ मार्च १७९५ च्या सरसेनापती दौलतराव शिंदे यांच्या नेतृत्वातील लढाईचा विजयोत्सव श्रीगोंद्यातील पूर्व चौकात साजरा झाला होता. तेंव्हापासून या चौकास विजय चौक झेंडा हे नाव पडले. याच चौकात या लढाईतील विजयाच्या आठवणीना उजाळा देत भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले.
२२८ वर्षांपूर्वी मराठे आणि निजामाची खर्डा येथे लढाई झाली होती.या विजयानंतर शहरातील विजय चौकात मराठा फौजांनी विजयोत्सव साजरा केला होता. या ऐतिहासिक घटनेची साक्ष देणारा भगवा ध्वज चौकामध्ये उभारून व आपला झेंडा चौक नावाचा फलक लावण्यात आला. विजय चौक झेंडा नवरात्र उत्सव समिती व व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने विजयोत्सव दिन व ध्वजारोहन सोहळा साजरा केला. यावेळी नगराध्यक्ष शुभांगी पोटे, नगरसेवक अशोकभाऊ खेंडके, निसारभाई बेपारी, मखरे, अख्तरभाई शेख, रमेश गांधी, झेंडा चौक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजुशेठ नय्यर, अनिल नन्नवरे, रवीशेठ दंडनाईक, अमित बगाडे, अतुल बगाडे, विशाल दंडनाईक, संदीप चौधरी, नितीन सर्यवंशी, कालिदास कोथिंबीरे, शिवप्रतिष्ठान, बजरंग दल, विघ्नहर्ता मित्र मंडळ, समर्थ मित्र मंडळ प्रतिनिधी उपस्थित होते. शिवाजी साळुंके यांनी खर्डा येथील लढाईतील पराक्रमाची माहिती सांगत शहरातील शिंदे सरकारच्या काळातील वास्तूचे पालिकेने संवर्धन करण्याची मागणी केली. झेंडा चौकात केलेले सुशोभीकरण हे समितीच्या स्वखर्चाने केले. चौकातील विजयी ध्वजाच्या नित्य पूजेची जबाबदारी समितीने घेतली असल्याचे समिती अध्यक्ष निखिल भागवत यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष निखिल भागवत, उपाध्यक्ष धनंजय खेत्रे, कर्याध्यक्ष प्रशांत काळे, सुशांत काळे, नंदकुमार चव्हाण, प्रतीक गायकवाड, विद्या ताडे, प्रसाद दीक्षित, वल्लभ ढोले, हर्षद काळे, आदित्य धोत्रे, रोहित नन्नवरे, विवेक खेत्रे, धनु दिक्षित, लखन नन्नवरे, सचिन नन्नवरे, शुभम घोणे, आनंद सांगळे, प्रतीक घाटे, संतोष खेत्रे, ओम ताडे, शुभम कर्डिले, योगेश लंगोटे, भैय्या शेळके, तुषार लोणकर यांनी मोलाचा वाटा उचलला.
COMMENTS