अहमदनगर | नगर सह्याद्री काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओबीसी समजा केलेल्या बद्दल बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ नग...
अहमदनगर | नगर सह्याद्री
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओबीसी समजा केलेल्या बद्दल बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ नगर शहर भाजप व ओबीसी आघाडीच्या वतीने दिल्लीगेट येथे राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून दहन करण्यात आले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कितीही आटापिटा केला तरी त्यांना जनाधार मिळत नाहीये. म्हणूनच ते कायम बेताल व वादग्रस्त वक्तव्य करत मीडियाची नजर आपल्याकडे वळवत असतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीचे आरोप करत आहेत.असे गलिच्छ राजकारण भाजप सहन न करता व शांत न बसता त्यास उत्तर देले जाईल. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातून काँग्रेसचे उच्चाटन झाले असून स्वतःची खासदारकीही त्यांनी गमावली आहे. त्यामुळे आतातरी राहुल गांधी यांनी बदलावे, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले. यावेळी राहुल गांधी व काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, शहर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, संतोष गांधी, वसंत राठोड, विजय काळे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, सचिन पावले, सुमित इपलपेल्ली, गोकुळ काळे, अनिल गट्टाणी, बाळासाहेब गायकवाड, अजय चितळे, सुमित बटूळे, रेखा विधाते, लीला अग्ररवाल, किशोर कटोरे, राजू मंगलारप, महावीर कांकरिया, संजय ढोणे, किशोर रायमोकर, नितीन फल्ले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी ज्ञानेश्वर काळे म्हणाले, माजी खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अक्षेपार्ह भाष्य करून संपूर्ण ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. ते कायम भाजपाच्या नेत्यांना टार्गेट करत असतात. त्यांनी त्वरित पंतप्रधानांची व पूर्ण ओबीसी समाजाची माफी मागावी.
COMMENTS