निघोज | नगर सह्याद्री भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पारनेर तालुयातील ऊस उत्पादक शेतकर्यांना आर्थिक पाठबळ मिळाले असल्याचे प्...
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पारनेर तालुयातील ऊस उत्पादक शेतकर्यांना आर्थिक पाठबळ मिळाले असल्याचे प्रतिपादन आपली माती आपली माणसं या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते रुपेश ढवण यांनी केले.
ढवण यांनी नुकतीच कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील भेट घेतली. ढवण म्हणाले, शेतकरी यावर्षी अवकाळी, शेतीमालाला भाव नसल्याने आर्थिक अडचणीत आहे. भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून उसाला चांगला भाव मिळाला आहे. सातत्याने कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व त्यांच्या सहकार्यांनी पारनेर तालुयातील जनतेला मोठे पाठबळ देत पारनेर तालुयासाठी आर्थिक योगदान दिले आहे. विकासकामे किंवा जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी वळसे पाटील सतत कार्यरत असतात.
ढवण यांच्या समवेत प्रगतीशील शेतकरी विशाल विठ्ठलराव लंके व अक्षय भाकरे होते. भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी ढवण व त्यांच्या सहकार्यांना मार्गदर्शन केले. आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेर मतदारसंघाचा विकास झाला असून भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून पारनेर तालुयातील शेतकर्यांना पाठबळ देण्याची ग्वाही वळसे यांनी दिली.
COMMENTS