नवीन चेहर्याना संधी देणार पारनेर | नगर सह्याद्री राज्यात सत्तेत असणारे भाजपा- शिवसेना ( शिंदे गट) पारनेर बाजार समिती निवडणुकीत एकत्र लढणार...
नवीन चेहर्याना संधी देणार
पारनेर | नगर सह्याद्रीराज्यात सत्तेत असणारे भाजपा- शिवसेना ( शिंदे गट) पारनेर बाजार समिती निवडणुकीत एकत्र लढणार असल्याची माहिती दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परीषदेत दिली.
या निवडणूकीत नविन चेहर्यांना संधी देण्यात येईल असे भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे व तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे यांनी सांगितले. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची सोमवार पासून रणधुमाळी सुरू झाली असुन प्रत्येक पक्ष भूमिका मांडताना दिसत आहे. भाजपा व शिवसेना शिंदे गटाने पत्रकार परिषद घेत ही निवडणूक पुर्ण ताकदीने लढवणार असल्याचे जाहीर केले.या बैठकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, युवा नेते राहुल शिंदे पाटील भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, युवा नेते सचिन वराळ पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहकले् डॉ.भाऊसाहेब खिलारी, माजी सभापती बापु भापकर उपस्थित होते.
यावेळी माहीती देताना भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे व तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे म्हणाले,पारनेर बाजार समिती ही कांद्याच्या व्यापाराबाबत राज्यात प्रसिद्ध आहे. केंद्रासह राज्यातही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. शेतकर्यांंना व बाजार समितीला मुलभूत सोयी सुविधा व या ठिकाणी विविध विकासकामे करायचे असल्याने सत्ता असणे आवश्यक आहे.या निवडणुकीत जास्तीत जास्त तरूण व नविन सदस्यांना संधी देण्याचा निर्णय झाला आहे इच्छुकांनी पारनेर येथील भाजपा कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS