कर्नाटक / नगर सह्याद्री - भारतीय निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कर्नाटकची निवडणूक एका टप्प्यात होणार असून...
कर्नाटक / नगर सह्याद्री -
भारतीय निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कर्नाटकची निवडणूक एका टप्प्यात होणार असून 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर केले जाणार आहे. येत्या 24 मे रोजी कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यापूर्वी निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे
80 वर्षांहून अधिक वयाचे लोक घरातून मतदान करू शकतील.
कर्नाटकात 9.17 लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली.
1 एप्रिल रोजी ज्यांचं वय 18 असेल ते तरुण-तरुणी देखील मतदान करू शकतील.
नवीन मतदारांना जोडण्यावर भर देण्यात येत आहे.
24 मे पूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.
कर्नाटकमध्ये एकूण 5.22 कोटी मतदार आहेत.
निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आभियान चालवले जाईल.
240 मॉडल मतदान केंद्र बनवले जाईल.
कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 224 जागांवर निवडणूक होणार आहे. 224 सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसचे 69 आमदार आहे. दरम्यान 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 80 जागा जिंकल्या, तर जेडीएसने 32 जागा जिंकल्या आणि भाजपला 117 जागा मिळाल्या होत्या. याशिवाय 6 इतर आमदार निवडून आले होते. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळू शकले नाही.
COMMENTS