पारनेर | नगर सह्याद्री तरुणांसह इतर अनेक माणसे व्यसनाधीन झाली असून आरोग्य ग्राम जखणगाव व्यसनमुक्तीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ...
पारनेर | नगर सह्याद्री
तरुणांसह इतर अनेक माणसे व्यसनाधीन झाली असून आरोग्य ग्राम जखणगाव व्यसनमुक्तीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक शिरीषकुमार देशमुख यांनी दिले.
आरोग्य ग्राम जखणगांव येथील ग्रामपंचायतने स्वच्छता, आरोग्य, योगा आणि आता व्यसनमुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आर्थिक सुबत्ता आल्यास, तंटे मिटल्यास गावात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल व त्यानिमित्ताने व्यसनाला आळा बसेल. जखणगांव येथे महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष कुमार देशमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती मधील महिला बचत गट समन्वयक पंढरीनाथ ठाणगेे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मुर्तीच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.शिवप्रताप तरुण मंडळाने शिवनेरीवरून ज्योत गावात आणली होती. गेली २० वर्षे हा अभिनव उपक्रम राबवला जातो.सकाळी या शिवज्योतीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावचे सरपंच डॉ. सुनील गंधे यांनी गावातील अभियानाची माहिती पाहुण्यांना करून दिली. गावातील १५ बचत गटांच्या सुमारे १५५ महिलांना पंढरीनाथ ठाणगे यांनी शासनामार्फत मिळणार्या विविध अर्थसहाय्ययोजनांची माहिती दिली.पुजा बोरगे, रोहिणी आगरकर, सोनाली शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सरपंच डाँ. सुनिल गंधे, बी. आर. कर्डिले, प्रगती कर्डिले, साबिया शेख, रावसाहेब भीसे, बाबासाहेब भीसे अशोक देवकर, विजय जगताप, संजय गायकवाड ,बाळासाहेब कर्डिले, सुहास हाडोळे, रवी कर्डिले, सुभाष सौदागर ,बाळासाहेब शहाणे, सुरेश कारले, रमेश आंग्रे, बाळू काळे नवनाथ वाळके, नंदा कर्डीले, कुसुम गुंजाळ ,परविण शेख उपस्थित होते.
COMMENTS