मुंबई - उर्फी जावेद नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फी जावेद हे नाव तिच्या कपड्यांवरून ओळखले जाते आहे. तिच्या अतरंगी कपड...
मुंबई - उर्फी जावेद नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फी जावेद हे नाव तिच्या कपड्यांवरून ओळखले जाते आहे. तिच्या अतरंगी कपड्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागलाय. अशातच आता तिच्यावर प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. अभिनेता फैजान अन्सारी याने धक्कादायक विधान केल्याने वादाला तोंड फुटले आहे.
उर्फी जावेद मुलगी नसून एक तृतीयपंथी आहे. असं फैजान अन्सारी म्हणाला आहे. उर्फी ज्या पद्धतीने बोलते. जसे कपडे घालते, यावरुन हे सिद्ध होतंय की, ती तृतीयपंथी आहे. उर्फी तृतीयपंथी असल्याचे काही पुरावे माझ्याकडे आहे. तुम्ही तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास ती मुलगी नसून तृतीयपंथी असल्याचं तुमच्या लक्षात येईल, असं धक्कादायक वक्तव्य फैजान अन्सारीने केले आहे.
उर्फीने स्वत: तृतीयपंथी असल्याचं मान्य करावं, असा सल्ला देखील अन्सारीने उर्फीला दिलाय. असं केलं नाही तर तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं अन्सारीने सांगितलंय. ईटाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. त्यामुळे यावर आता उर्फी काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
COMMENTS