अहमदनगर। नगर सहयाद्री- राज्यात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमद...
अहमदनगर। नगर सहयाद्री-
राज्यात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले. चंद्रशेखर घुलेंचा पराभव अजितदादांच्या जिव्हारी लागला. त्या पाश्वभुमीवर बोलत असताना अजित दादा म्हणाले गद्दारी करणाऱ्याला झटका दिल्याशिवाय राहणार नाही,असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
अहमदनगर जिल्हा बँकेची नुकतीच निवडणूक नुकतीच पार पडली अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांनावर अजितदादा संतापले आहे. गद्दारीमुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रशेखर घुलेंचा यांचा पराभव झाला. हा पराभव म्हणजे राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो. हा धक्का अजितदादांच्या जिव्हारी लागला. याच पार्श्वभूमीवर, अजित पवारांनी गद्दारांना इशारा दिला आहे. गद्दारी करणाऱ्याला झटका दिल्याशिवाय राहणार नाही, असं अजितदादा म्हणाले.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले. कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद झाले. जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे-पिता पुत्राची खेळी यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.
COMMENTS