नवी दिल्ली : चित्रपट अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझवर निशाणा साधला आहे. कंगनाने सोशल मीडि...
नवी दिल्ली : चित्रपट अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझवर निशाणा साधला आहे. कंगनाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले एक मीम शेअर करण्याच्या बहाण्याने दिलजीत दोसांझची खिल्ली उडवली आणि इशार करत त्याला अटक करण्याची धमकीही दिली. कंगनाने काल (मंगळवारी) ट्विटरवर स्विगी इन्स्टामार्टची एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये विविध प्रकारच्या डाळींची छायाचित्रे दाखवली गेली आहेत. ही पोस्ट शेअर करत कंगनाने लिहीले होते ओये पल्स आ गई पल्स. तसेच या पोस्टवर कंगनाने दिलजीतलाही टॅग केले आणि पुढे र्गीीीींरूळपस असे लिहीले आहे. मात्र हे प्रकरण केवळ इथेच थांबले नाही. त्यानंतर कंगनाने इंस्टाग्रामवरही यासंदर्भात पोस्ट शेअर केली असून त्यापुढे दिलजीत दोसांझ जी पोल्स आ गई पोल्स. असे लिहीले आहे. एवढेच नव्हे तर तिने त्यासोबत धोयाचे चिन्ह आणि हसणार्या व्यक्तीचा फोटोही मीम स्वरुपात टाकला आहे. तर पुढल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने लिहीले आहे की , ज्यांनी खलिस्तानींना पाठिंबा दिला त्यांनी आता लक्ष द्या आणि लक्षातही ठेवा, पुढचा नंबर तुमचा असेल. पोल्स (पोलिस) आले आहेत. ती वेळ आता गेली, जेव्हा कोणीही काहीही करायचे. देशाशी गद्दारी करण्याचा किंवा (देश) तोडण्याचा प्रयत्न करणे महागात पडेल. असेही तिने या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
COMMENTS