पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील खडकवाडी सारख्या दुर्गम भागात ढोकळे फाउंडेशनने विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून इंग्रजी ...
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील खडकवाडी सारख्या दुर्गम भागात ढोकळे फाउंडेशनने विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून इंग्रजी शिक्षण उपलब्ध करून दिले आहे परंतु वार्षिक स्नेहसंमेलन निमित्ताने सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या कलागुणांना वाव दिला असल्याचे गौरवोद्गार शालेय शिक्षण मुंबई उपसचिव टी.व्ही.करपते यांनी काढले.
तालुयातील खडकवाडी येथील कै. विठ्ठलराव नारायण ढोकळे फाउंडेशनचे एस. एन. एज्युकेअर इंटरनॅशनल स्कूल आयोजित सांस्कृतिक महोत्सव व शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करपते होते. प्रमुख पाहुणे म्हणुन प्रसिद्ध मराठी वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामतीमधील कलाकार बाळासाहेब उर्फ भरत शिंदे, रामभाऊ उर्फ रामदास जगताप, व सुभाषराव उर्फ सुभाष मदने तसेच ज्ञानदेवजी लंके, सुनिल चौधरी व उद्योजक अदिकशेठ खेमनर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तिसरी व चौथी इयत्तेच्या मुलींनी वागत गीताने केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष प्रा. नितीन ढोकळे यांनी केले. त्यांनी संस्था उभारणीचा मूळ हेतू, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था करत असलेले प्रयत्न, उपलब्ध भौतिक सुविधा, स्पर्धा परीक्षा व इतर अवांतर उपक्रमाविषयी माहिती दिली. आपल्या हास्यविनोदाने बाळासाहेब उर्फ भरत शिंदे, सुभाषराव व रामभाऊ यांनी मंत्रमुग्ध केले . आपल्या भाषणातून बाळासाहेब यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मुलांमध्ये अनेक कलागुण दडलेले असतात. त्या कलागुणांना स्टेज निर्माण करण्याचे काम प्रा.नितीन ढोकळे व त्यांची संस्था यशस्वीपणे करत आहे. संस्थेची गगन भरारी या पुढील काळातही सदैव राहील अशा शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाचे अध्यक्ष टि.व्ही.करपते यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मुलांसाठी ही शिक्षण संस्था उच्च दर्जाचे काम करत असून गुणवत्ता पूर्ण शिक्षणास प्राधान्य देत आहे. शहरात मिळणार्या सुख सुविधांच्या पटीमध्ये ग्रामीण भागातही अशा सुविधा उपलब्ध करून देणारी ही एकमेव शाळा असेल. शैक्षणिक वर्ष २०२२ -२३ मध्ये शाळेने सुंदर हस्ताक्षर, चित्रकला, उत्कृष्ट वेशभूषा, कबड्डी,खो-खो , धावणे , लांबउडी इत्यादी शालेय स्पर्धा तसेच विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास ट्रॉफी, द्वितीय व तृतीय क्रमांक मेडल व सहभागी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. १३० विद्यार्थ्यांना उपस्थितांच्या हस्ते ट्रॉफी,मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले .सदर कार्यक्रम प्रसंगी पळशी, वनकुटे, मांडवा, देसवडे , काळेवाडी, खडकवाडी, साकुर , कन्हेर, पोखरी , कामटवाडी ,वारणवाडी, वासुंदे, टाकळी ढोकेश्वर परिसरातील पालक व ग्रामस्थ व महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच प्रकाश राठोड, ह.भ.प.जालिंदर वाबळे, मोहनराव रोकडे, जगदीश पाटील गागरे, किसनराव आहेर, दावजीराम शेठ वाबळे, प्रतापराव रोकडे, बाबासाहेब भोर, बी.डी. ढोकळे, शशिकांत टेकुडे, भाऊसाहेब सागर, आप्पासाहेब शिंदे, यशवंत जाधव, तुकाराम जाधव, धनंजय ढोकळे, विमलताई दाते उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भोर व राणी गागरे यांनी केले. विद्यार्थ्यांची सुंदर वेशभूषा व कोरिओग्राफी पूजा गागरे, रूपाली हारदे, सीमा दाते यांनी केली. कार्यक्रमास लहानुभाऊ गाडगे ,अशोक खाडे, प्रदीप खाडे व बाबासाहेब ढोकळे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रवी ढोकळे ,योगेश शिंदे डॉ.आग्रे, अमोल रोकडे, देविदास साळुंखे ,राजू रोकडे, निखिल मोडवे , स्वप्निल गागरे, चेतन गागरे, गणेश ढोकळे व श्री ढोकेश्वर विद्यालयाचा सर्व स्टाफ यांचा वाटा होता.उपस्थितांचे आभार संस्थेच्या सचिव शुभांगी ढोकळे यांनी मानले.
COMMENTS