उत्तरप्रदेश / नगर सह्याद्री - उत्तरप्रदेशातील रायबरेली येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. जीवापाड प्रेम करत असलेल्या प्रियकराचं अचानक एका रस्ता...
उत्तरप्रदेश / नगर सह्याद्री -
उत्तरप्रदेशातील रायबरेली येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. जीवापाड प्रेम करत असलेल्या प्रियकराचं अचानक एका रस्ता अपघातात दुर्देवी निधन झाले आहे. या घटनेने प्रेयसीला मोठा धक्का बसला आहे. तिने जेवण-पाणी सोडले आहे. ती कोणाशीच बोलत नव्हती. तसेच कायम मौन बाळगलेल्या अवस्थेत असायची. अखेर प्रियकराचा विरह सहन न झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले आहे.
प्रेयसीने काळीज पिळवटून टाकणारी सुसाईड नोट लिहून ठेवली आणि आपल्या राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. अंगावर काटा आणणारी ही दुर्देवी घटना उत्तरप्रदेशातील रायबरेली जिल्ह्यात घडली आहे.
सुनिता (वय २३ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. गुरूवारी सुनिताचा मृतदेह तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सुनीताच्या आत्महत्येची बातमी कळताच परिसरात एकच खळबळ माजली आहे.
सुनिताने आत्महत्या केली तेव्हा कुटुंबीय शेतात कामाला गेले होते. घराच्या आजूबाजूला खेळणाऱ्या मुलांनी सुनीताला फासावर लटकलेले पाहिल्यानंतर ही माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुनिताचा मृतदेह ताब्यात घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनिताचे आपल्याच नातेवाईकातील कुलदीप नावाचा एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या अनेक दिवसांपासून सुनिता आणि कुलदीपचा एकमेकांवर जीव जडला होता. सुनीताच्या मैत्रीणीने दिलेल्या माहितीनुसार, दोघेही लवकरच लग्न करणार होते.
मात्र, दोघांचे हे प्रेम नियतीला मान्य नव्हते. होळीच्या दिवशी म्हणजेच ८ मार्च रोजी कुलदीप हा दुचाकीवरून जात असताना त्याचा अपघात झाला. या अपघातात कुलदीपचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. कुलदीपच्या निधनाची बातमी कळताच सुनीताला मोठा धक्का बसला.
COMMENTS