श्रीगोंदा | नगर सह्याद्री दरोडा, खून, जबरी चोरी व इतर गंभीर गुन्ह्यातील फरार चार सराईत गुन्हेगाराच्या मुसया आवळण्यात अहमदनगर येथील स्थानिक ग...
दरोडा, खून, जबरी चोरी व इतर गंभीर गुन्ह्यातील फरार चार सराईत गुन्हेगाराच्या मुसया आवळण्यात अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
याबाबत माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील दिवटे वस्तीवरील कल्याण मच्छिंद्र गायकवाड यांच्या घरी सशस्त्र दरोडा पडला होता. घरातील महिलांच्या अंगावरील दागिने चोरून नेताना प्रतिकार करणार्या कल्याण मच्छिंद्र गायकवाड यांच्यावर धारदार शास्त्राने वार करून चोर पळून गेले होते. या चोरट्यांच्या मारहाणीत कल्याण मच्छिंद्र गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला होता. शर्मिला कल्याण गायकवाड यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
घटनेचे पडसाद श्रीगोंदा तालुयात उमटले. अरणगाव दुमाला येथील ग्रामस्थांनी बेलवंडी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या मांडून आंदोलन करत आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन आरोपीचा शोध सुरू केला. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी निमकर काळे (रांजणगांव मशिद, ता. पारनेर) त्याच्या तीन साथीदारांसह तळेगांव दाभाडे येथील जुना टोलनाका येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी झाडा झुडपात पळून जात असताना पाठलाग करून पकडले. निमकर अर्जुन काळे (वय २१) शेखर उदास भोसले ( वय २०, रा. कोळगांव, ता. श्रीगोंदा), अतुल उदास भोसले (वय १९, रा. कोळगांव, ता. श्रीगोंदा) व एक अल्पवयीन बालक अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी रायगव्हाण,( ता. श्रीगोंदा) व पारनेर तालुयात वडनेर हवेली व राळेगणथेरपाळ येथे चोरी केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.
COMMENTS