मुंबई / नगर सह्याद्री - आयटी क्षेत्रात आता मंदीचं वादळ आले आहे. आघाडीवर असलेल्या एक्सेंजर कंपनी संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. या कं...
मुंबई / नगर सह्याद्री -
आयटी क्षेत्रात आता मंदीचं वादळ आले आहे. आघाडीवर असलेल्या एक्सेंजर कंपनी संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. या कंपनीने तब्बल १९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी कंपनीने हा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २.५ टक्के कर्मचारी कामावरून कमी केले जाणार आहे.
टेक कंपन्यांमध्ये सातत्याने नोकर कपात होत आहे. या आधी अॅमेझॉन कंपनीने देखील ९००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. टेक कंपन्या गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आपल्या कर्मचाऱ्यांना कमी करताना दिसत आहे. त्यामुळे मंदीचे सावट असल्याचे म्हटले जात आहे.
वाढत असलेली महागाई, वाढते व्याजदर तसेच मागणीची मंदी असल्याने आयटी क्षेत्रात लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहे. Cognizant ही Accenture ची प्रतिस्पर्धी कंपनी आहे. या कंपनीने काही महिन्यांपूर्वीच व्यवहारांमध्ये कशी घट सुरू आहे हे सांगितले आहे. याला कारणीभूत असलेल्या गोष्टींवर देखील त्यांनी भाष्य केले होते.
COMMENTS