पक्ष व जनतेपेक्षा आर्थिक लाभासाठी पाटलाची उठाठेव : माजी सभापती सुदाम पवार पारनेर | नगर सह्याद्री आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून मंजू...
पक्ष व जनतेपेक्षा आर्थिक लाभासाठी पाटलाची उठाठेव : माजी सभापती सुदाम पवार
पारनेर | नगर सह्याद्री
आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेली १०२ कोटींचा कामांना पालकमंत्री आणि खासदारांनी आडकाठी केली आहे. मतदारसंघातील जनतेचा जर तुम्हाला एवढा मोठा कळवळा आहे. तुम्ही नेत्यांनी जी १०२ कोटीची कामांची टाकलेली आडकाठी काढा नंतरच लोक जनकल्याणाच्या गप्पा मारा.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे नगराध्यक्ष विजय औटी सुदाम पवार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
सुदाम पवार म्हणाले, पाटील आपण कधी शिवसेनेमध्ये कधी भाजपमध्ये आणि रात्रीचे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांन भेटता. कधीतरी आम्हाला असं वाटतं की पाटील आपल्या तालुक्यातील काहीतरी विकास कामे घेऊन तिथे गेले असतील तालुक्यासाठी मोठा निधी घेऊन येतील परंतु दुसर्या दिवशी कळते पाटील पक्ष व जनते पेक्षा स्वतःच्या आर्थिक लाभासाठी त्या ठिकाणी जात असतात अशी टीका माजी सभापती सुदाम पवार यांनी केली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, नगराध्यक्ष विजय औटी, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे, माजी सभापती सुदाम पवार, कारभारी पोटघन, मेजर राहुल झावरे, भाऊसाहेब भोगाडे रा.या.औटी सचिन गवारे, संदिप चौधरी, उपस्थित होते.
बाबाजी तरटे म्हणाले, आघाडी सरकारच्या काळामध्ये जवळजवळ १०२ कोटीची कामे मतदारसंघांमध्ये आमदार निलेश लंके मंजूर केली होतीेे पालकमंत्री आणिे खासदारनी संपूर्ण कामाला स्थगितीे दिली आहे. जाणीवपूर्वक कामाच्या निविदा काढून दिल्या जात नाही. नगरपंचायतीची पाच कोटीची काम आहे. पर्यटनाची १० कोटींची काम आहेत. ३०/५४ मधील ३ कोटींची काम आहे. आणि २५/१५ मध्ये ५ कोटीच काम आहे . १०२ कोटींची कामे पालकमंत्री आणि खासदारांनी अडविली असल्याचा आरोप बाबाजी तरटे यांनी केला आहे.
आमदार निलेश लंके हे विधिमंडळाचे सदस्य आहेत. बजेटमध्ये ८५ कोटी रुपयांची कामे मंजूर करूंन आणली आहे. ४ वर्षाच्या काळामध्ये निलेश लंके यांनी ९०० कोटीचा निधी या मतदारसंघांला मिळाला आहे. अण्णासाहेब हजारेंचे नाव घेतलं जातं मुळात विषय असा आहे अण्णा हे आमचे सर्वांचे दैवत आहे. लोकनेते अण्णांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघांमध्ये काम करत असतात.
पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही पत्र दाखवले जुन्या तारखेवर शिक्का मारून १५ माार्च या तारखे चे पत्र आहे. राज्याचे बजेट हे ८ मार्चला सादर झाले. खोटी पत्रे सादर करून आमदार निलेश लंके यांचे श्रेय लाटण्याच हा प्रयत्न आहे. आमदार निलेश लंके भांडत असतात, आपले मुद्दे मांडत असतात.
राष्ट्रवादीच्या माध्यमातून निलेश लंके यांनी रस्ता रोको आंदोलन केले त्याचा आवाज विधानसभेमध्ये दुमदुमला गेला. सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. शेतकर्यांच्या विषयावरती काहीतरी बोलतील असं वाटलं होत तस झालं नाही. ज्वारी गव्हाची काढणी झाली आज गावाचा ज्वारीचा बाजार बघा कुठेही शेतकर्याच्या मालाला त्यांनी उत्पादित केलेल्या उत्पन्नाचा खर्च आणि विक्री याच्यामध्ये कुठेही ताळमेळ बसत नाहीत.
२०२२ रोजी राज्याच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली त्याच्यानंतर ९ ऑगस्ट २०२२ रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि २४ सप्टेंबर २०२२ रोजी पालकमंत्री यांची निवड झाली.याच्यामध्ये पालकमंत्र्यांचा कुठेही काही संबंध येतो का खोटं किती बोलायचं ? असा सवाल तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी केला आहे.आमदार निलेश लंके यांनी प्रतिष्ठा पणाला लावून कामे मतदार संघात आणली आहे. आपण ही कामे आणली असल्याचा कांगावा केला जात आहे.
२७ मार्चला जलसंधारण कार्यालयात आमदार निलेश लंकेचे उपोषण..
नगर मतदार संघातील वरील संदर्भिय नुसार एकुण ३० कामांना मे २२ अखेर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून प्रशासकिय मान्यता मिळाली होती.कामांना तांत्रिक मान्यता मिळुन निवीदा प्रसिध्दीस देऊन निवीदा कार्यवाही प्रगतीत होती. परंतु ८ जुलै रोजी शासन स्तरावरुन या कामाना स्थगिती देण्यात आली. ऑक्टोबर २०२२ मध्ये शासनाने सदरच्या कामांना दिलेली स्थगिती उठवण्यात आली होती. ऑक्टोबर २०२२ मध्ये स्थगिती उठुन सुध्दा मंजूर कामांचा निवीदा बाबत कुठलीच कार्यवाही झालेली नाही. मी स्वतः आपल्याशी व आपले विभागाशी वारंवार संपर्क करुन देखील कुठलीही दखल आपण घेतलेली नाही. तसेच आपल्या लक्षात आणुन देतो की शासन निर्णयानुसार जलसंधारण महामंडाळातील इतर तालुक्यातील कामाची निवीदा प्रक्रिया प्रगतीत आहे. असे असताना माझ्या मतदार संघातीलच कामांना जाणीव पुर्वक टाळण्यात येत आहे. २७ मार्च २०२३ पासुन आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे. उपोषणास लाभधारक शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी निवेदनात म्हटले आहे.
सुदाम पवार म्हणाले, पाटलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ती जिल्हा रस्ता कमिटी आहे. तुम्ही लोकांना खोटं सांगता आपण पूर्ण अभ्यास करूनच लोकांसमोर प्रश्न मांडला असेल. आम्ही जनता तुम्हाला मान देतो याचा अर्थ तुम्ही काहीतरी खोटं सांगायचं नाही. बजेट प्लेट आणि अर्थसंकल्पीय काम हा शब्द एकच आहे बजेट प्लेटमध्ये मग त्या ठिकाणी खासदार किंवा आमदार असू द्या काम सुचवण्याचा अधिकार त्याना असतो. ती काम सुद्धा प्लेटमध्ये नोंदवली जातात बजेटमध्ये प्लेटमध्ये नोंदवल्याच्या नंतर लोकप्रतिनिधीच नाव त्याठिकाणी येत असत. तुम्ही जनतेची दिशाभूल करत आहात. जनतेच्या जीवावरती निवडून येतो त्या जनतेला फसवू नका कारण ही जनता फार हुशार आहे. पारनेर लोकप्रतिनिधींचे हजार काम दाखवू तुम्ही जिल्हा पुढार्याचे एक तरी काम सांगा. पारनेर मध्ये तुम्ही लक्ष देतात परंतु तुम्हाला पुढचं काहीतरी दिसत आहे.
राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे
आमदार निलेश लंके एक सामान्य कुटुंबातून आमदार झाले आहे. सामान्य कुटुंबातलं पोरगं तालुक्याचा आमदार झालं ही गोष्ट मान्य नाही. कुठेतरी ही गोष्ट मान्य करा आणि त्या पद्धतीने हे काम करतात तुम्ही सुद्धा काम करा जनतेमध्ये सुखदुःखामध्ये जा. प्रत्येक इलेक्शनला तुमचे चिन्ह वेगवेगळे असतात. अण्णा हजारेंना तुम्हीच नाही तर संपूर्ण भारत देश अण्णांना गुरु मानतो. अण्णांना प्रशासन कसं चालतं ते चांगल्या पद्धतीने कळतं ते तुम्ही सांगायची काय गरज नाही. आमदार निलेश लंके कोरोना काळात गोरगरीबांची सेवा करत होते तुम्ही रेमिडीसीवर रुपी मेवा खात होते. तुम्ही बेगडी प्रेम दाखवता ते कुठेतरी बंद करा खरं तुमची काम जनतेला दाखवा. तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये शेतकर्यांच्या मुद्द्यावर बोलाल शेतकर्यांविषयी कुठल्याही प्रकारचा शब्द सुद्धा काढला नाही. शेतकर्यांचे नुकसान झाले ते काहीच बोलले नाही. शेतीमालाचे भाव पडत राहिले तर आम्ही पालकमंत्र्यांना तालुका बंदी करणार आहोत. शेतकर्यांसाठी पालकमंत्र्यांना तालुका बंदी करायची असेल तर तुम्ही करून दाखवा. शेतकर्यांचे मुद्दे मांडा शेतकर्यांच्या प्रश्नांवर भांडा. महिलांना ५० टक्के बस सवलत दिलेली आहे महिलांना ५०% बस सवलत देण्याच्या ऐवजी गॅस जी आहे घरगुती चालू करा गॅसचे भाव कुठेतरी कमी करा. महामंडळाच्या बस अशा झालात का त्याच्यामधून शिरूर पारनेर प्रवास केला तर संध्याकाळी एक पॅरिसिटी मध्ये गोळी खावी लागते म्हणजे अशा पद्धतीच्या बसमध्ये ५०% सवलत देत आहे. माननीय पालकमंत्री महोदयांनी असेल किंवा खासदार साहेबांनी तालुक्यामध्ये जमीन घेतलेली आहे. त्या जमिनीमध्ये सातबारा प्रकल्प होणारे असं भरपूर दिवसापासून ऐकले या प्रकल्पाचे नियोजन करत बसा. जे काम जमल तीच करा उगाच लोकां प्रतिजंतेपती खोटं प्रेम दाखवू नका. काय वागायचं ते खरं वागा सरळ सरळ वागा असेही सुवर्णा धाडगे म्हणाल्या.
COMMENTS