शेतीमालाचा भाव वाढल्यावर दंगा करणारे आता गप्प; पवारांचा सरकारवर हल्लाबोल आमदार लंके तालुयासाठी सुवर्ण माणूस - शरद पवार ः सात हजार विद्यार...
आमदार लंके तालुयासाठी सुवर्ण माणूस - शरद पवार ः सात हजार विद्यार्थ्यांना सायकल, गरिबांना १०० घरांचे वितरण
शरद झावरे / दत्ता उनवणे | नगर सह्याद्री -
आज राज्यासह देशातील बळीराजा अवकाळी व शेतीमालाला भाव नसल्याने दुहेरी संकटात सापडला आहे. शेतीमालाचा भाव वाढल्यावर दंगा करणारे आज मात्र गप्प आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी टीका केली. आ. नीलेश लंके तालुयासाठी सुवर्ण माणूस आहे. एका कर्तृत्ववान माणसाचा वाढदिवस असून वाढदिवसाला सामाजिक उपक्रमांची जोड देवून नवा आदर्श उभा केला, असो गौरवोद्गार पवार यांनी काढले.

आ. नीलेश लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघातील सुमारे सात हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप व शंभर गरिबांना घरांचे वाटप करण्यात आले. तसेच बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे नामकरण, विकास कामांचे उद्घाटन पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, अरूण कडू, राहुल जगताप, महानगर बँकेच्या अध्यक्षा सुमनताई शेळके, बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, अॅड. प्रताप ढाकणे, सुरेश बापडे, राहुल सागर, घनश्याम शेलार, भैरवनाथ काळे, काकासाहेब कोयटे, अशोक सावंत, बाबाजी तरटे, प्रशांत गायकवाड, सौ राणीताई लंके आदी उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, शेतीमालाला कमी भाव मिळाल्याने अर्थव्यवस्था संकटात आहे. यंदा उसाला व कांद्याला भाव नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. तसे पत्र आमदार नीलेश लंके यांनी मला दिले आहे.एकीकडे शेतकरी संकटात सापडला असताना राज्य सरकार व केंद्र सरकार पहायला तयार नाही. लोकसभेचे अधिवेशन तीन दिवसाने चालू होणार आहे. त्यामध्ये कांदा व उसाबाबत आवाज उठविला जाईल. ग्रामीण भागातील शेतीमालाचे कोसळलेले भाव यामुळे अर्थव्यवस्था ढासळली आहे. कांद्याचा भाव वाढल्यावर दंगा करणारे आज मात्र गप्प आहेत. पिकासाठी आठ ते दहा रूपये खर्च येत असताना दोन-तीन रुपये भाव देऊन सरकार कांदा उत्पादकांची चेष्टा करत आहेत.
पवार म्हणाले, पारनेर दुष्काळी तालुका असला तरी अनेक सहकार व राजकीय चळवळीत योगदान दिले आहे. कष्टकरी माणसाला उभे करण्याचे काम पारनेरच्या संघर्षशील माणसाने केले आहे. जीएस महानगर बँकेच्या अध्यक्षा सुमन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम चालू आहे. कष्ट करण्याचे, घाम गाळण्याचे काम करत पारनेर तालुका कर्तृत्व व मेहनतीवर चारचाकी घेऊन फिरतो, ही अभिमानाची बाब आहे. पारनेर तालुयाला कोरोना असो इतर संकट काळात सर्वसामान्य लोकांसाठी कोविड सेंटर काढून दिलासा देण्याचे काम केले आहे. सक्षम नेतृत्व व आदर्श काम आमदार नीलेश लंके यांनी केले आहे. विमानात व हॅलीकॉप्टरमध्ये न बसलेला आमदार लंके हा पहिल्यांदा माझ्याबरोबर बसला असून सायकलवर बसून लोकांची सेवा करण्याचे काम केले आहे. यापुढेही सर्वसामान्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आमदार लंके यांना बळ मिळो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त याच त्यांना शुभेच्छा.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, सामान्य कुटुंबात जन्मलेला व सर्व सामान्य जनतेशी नाळ ठेवणारा आमदार नीलेश लंके यांच्या कार्यामुळे दुष्काळी असलेला पारनेर तालुका बदलत चालला आहे. शेतीला दुधाची जोड मिळाल्याने ग्रामीण भागात बदल झाला. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शरद पवार यांनी काम केले. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. आमदार लंके यांनी कोरोना काळात हजारो लोकांना जिवदान देऊन गोरगरीब जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या. पाणी आले, पीक आले परंतु केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे कांदासह शेतीमालाला भाव मिळत नाही. राज्याच्या अर्थसंकल्पात मुलभूत प्रश्नांना स्थान नाही. महिला शिक्षण, आरोग्य याला स्पर्श झाला नाही. तालुयात आ. लंके यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार नीलेश लंके म्हणाले, ग्रामीण भागातील मतदारसंघात दौरा करताना अनेकदा मुले शाळेत पायी चालताना पाहिली. त्यामुळे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून सायकल प्राप्त झाल्या. ज्यांच्यामुळे अशय गोष्ट शय होते, ते म्हणजे शरद पवार. जोपर्यंत त्यांचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे, काहीच अशय होणार नाही. उद्योजक राहुल सागर यांच्यासारख्या दानशूर व्यक्तीने पवार साहेबांच्या शब्दावर एवढ्या मोठ्या सायकल भेट दिल्या आहेत. पवार साहेब आमच्यासाठी परिस आहेत, मी स्वतःला भाग्यवान समजतो. परंतु सामाजिक, राजकीय काम करत असताना विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. शरदचंद्र पवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे माझे स्वप्न आहे. तुम्ही अदृश्य शक्ती असून माझे हे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी केली.
यावेळी ज्ञानदेव लंके, दीपक लंके, राजेंद्र चौधरी, मधुकर उचाळे, कारभारी पोटघन, डॉ. बाळासाहेब कावरे, मेजर जितेश सरडे, संजय लाकुडझोडे, खंडू भुकन, सुदाम पवार, बा. ठ. झावरे, मच्छिंद्र लंके, भागुजी दादा झावरे, अर्जुन भालेकर, अशोक घुले, कैलास गाडिलकर, अनिल गंधाक्ते, सचिन पठारे, पुनम मुंगसे, विक्रमसिंह कळमकर, शिवाजी लंके, विजय औटी, राहूल झावरे, कारभारी पोटघन, दौलत गांगड, संदीप चौधरी, सचिन गवारे, बापूसाहेब शिर्के, बाळासाहेब लामखडे, अमृता रसाळ, किसन रासकर, शिवाजी लंके, राहुल खामकर, सुनील वराळ, विठ्ठल कवाद, विश्वास शेटे, संदीप वामन वराळ, सुखदेव ढवळे, नवनाथ लाळगे, शांताराम लाळगे, बाळासाहेब लंके, सरपंच सोमनाथ आहेर, प्रकाश गाजरे, पियुष गाजरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, भास्करराव कवाद, आदर्श गाव टाकळी हाजी गावचे माजी सरपंच दामुशेठ घोडे, सरपंच व पंचायत समिती माजी सदस्या अरुणाताई घोडे, अतुल लोखंडे, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, सहाय्यक निबंधक गणेश औटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉटर सेलचे तालुका अध्यक्ष डॉ. आबासाहेब खोडदे, कान्हुरपठार पतसंस्थेच्या चेअरमन सुशिलाताई ठुबे, उपाध्यक्ष नामदेवराव थोरात व सर्व संचालक, माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकरशेठ कवाद, उपाध्यक्ष शांताराम लंके, माजी सभापती गंगाराम बेलकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, नीलेश लंके प्रतिष्ठाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जवळा येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी योजनेचे भूमिपुजन, रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयाच्या इमारतीचे लोकापर्ण, देवीभोयरे येथील जल जीवन योजनेअंतर्गत पाणी योजनेचे भूमिपूजन, गावच्या कमानीने लोकार्पण खा. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. निघोज येथे राज्य शासनाच्या निधीतून उभारलेल्या दिड कोटी रूपये खर्चाच्या अभ्यासिकेचे खा. पवार यांच्या हस्ते उदघाटन झाले. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत राबविण्यात येणार्या पाणी योजनेचे भूमिपुजनही यावेळी करण्यात आले. महाराष्ट्र केसरी चंद्रहास पाटील, हिंद केसरी संतोष वेताळ यांच्या वतीने चांदीची गदा देऊन आमदार नीलेश लंके यांचा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार लंके आदर्श लोकप्रतिनिधी ः पवार
आमदार नीलेश लंके हे पारनेर-नगर मतदारसंघाचे नेतृत्व करायला लागल्यापासून पारनेर तालुयाचा चेहरामोहरा बदलला आहे. कोरोना काळात हजारो लोकांना जीवनदान देऊन अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय उपक्रम राबवुन पारनेरचा नावलौकिक वाढविला आहे. त्यामुळे संघर्षशील पारनेरला आमदार नीलेश लंके यांच्या रूपाने सुवर्ण माणूस लाभला आहे, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आ. लंके यांच्या कार्याचा गौरव केला. आदर्श लोकप्रतिनिधी, असेही त्यांनी गौरवोद्गार काढले.
९९९ रूपयांत स्पर्धा परीक्षेसाठी प्रबोधिनी
स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी पुणे, मुंबई, दिल्ली येथे राहू शकत नाहीत. आर्थिक खर्च पेलवत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अवघ्या ९९९ रुपयांत नीलेश लंके प्रबोधिनीच्या माध्यमातून अभ्यासिकेची सुविधा निर्माण केली आहे. निघोज व कान्हुर पठार येथे तीन कोटी रुपयांच्या दोन अभ्यासिका उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना यांचा फायदा होणार असल्याचे आ. लंके यांनी सांगितले.
COMMENTS