मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झ...
मुंबई / नगर सह्याद्री -
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री तसेच बड्या नेत्यांना देखील बसला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे.
छगन भुजबळ यांना काल ताप आल्यानंतर त्यांनी आपली कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. अधिवेशन नंतर ते आजारी पडले होते. गेल्या दोन दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचण्या करून घ्यावा असे आवाहन देखील भुजबळ यांनी केले आहे. भुजबळ यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान यापूर्वी देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
COMMENTS