मुंबई । नगर सह्याद्री ऑस्कर २०२३ सोहळा लॉस एंजेलिसमध्ये सुरू आहे. यामधून सध्या एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. आरआरआर चित्रपटात...
मुंबई । नगर सह्याद्री
ऑस्कर २०२३ सोहळा लॉस एंजेलिसमध्ये सुरू आहे. यामधून सध्या एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे. या बातमीने भारतीय प्रेत्रकांना सुखद धक्का दिला आहे. या गाण्याने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील पटकावला होता. आता या गाण्यानं ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटामधील ‘नाटू नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे. अप्लॉज (टेल इट लाइक अ वुमन), होल्ड माय हँड (टॉप गन मॅव्हरिक), लिफ्ट मी अप (ब्लॅक पाथेर वाकांडा फॉरेव्हर), आणि दिस इज ए लाइफ (एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स) या गाण्यांना मागे टाकत ‘नाटू नाटूने’ ऑस्कर पटकावला.
COMMENTS