अहमदनगर | नगर सह्याद्री सर्वसामान्य नागरिक व गरजू रुग्णांसाठी माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांच्या द्वितीय पुण्यस्...
अहमदनगर | नगर सह्याद्री
सर्वसामान्य नागरिक व गरजू रुग्णांसाठी माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त ’आपला दवाखाना’ उपक्रमांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.१७ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ५ वाजे पर्यंत पाईपलाईन रोड वरील तुळजाभवानी मंदिरा समोरील माऊली क्रिटीकल केअर कार्डियाक अॅण्ड डायबेटीस हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य तपासणी होणार असल्याची माहिती संयोजक माजी नगरसेवक नितीन शेलार यांनी दिली.
’आपला दवाखाना’ येथे डॉ. संतोष गिते (एम.डी.) डॉ. सुजित मोटे (एम.डी.) डॉ. अमोल जाधवर (एम.डी.) डॉ. वर्षा गिते (एम.बी.बी.एस.) डॉ. गणेश गिते (एम.बी.बी.एस.) डॉ. तुकाराम गिते (सि, ई, वी.) व डॉ. भगवान दराडे (एम.डी.) आदी तज्ञ डॉटर रुग्णांच्या तपासण्या करणार आहेत. तसेच ईसीजी, कॅलशियम, रक्तशर्करा, ऑसिजन सॅच्युरेशन आदी तपासण्याही मोफत होणार आहेत. अधिक माहितीसाठी ९४२१४५८३०२ व ९८२२५७६२२३ या मोबाईलवर संपर्क साधावा.
COMMENTS