मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरण पुन्हा लांबणीवर गेले आहे. आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण तसेच महा...
मुंबई / नगर सह्याद्री -
ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरण पुन्हा लांबणीवर गेले आहे. आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण तसेच महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका या संदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार होती. मात्र आता ही सुनावणी २८ मार्च रोजी होणार आहे. महाराष्ट्र सरकारचे वकील तुषार मेहता हे आजच्या सुनावणीवेळी गैरहजर असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली गेल्याच म्हटलं जात आहे.
९२ नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. गेल्या तारखेच्या वेळी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी ५ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुरू होती.
गेल्या अनेक महिन्यांपासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. २१ मार्च रोजी न्यायालयात राज्य सरकार काय भूमिका घेणार यावर फैसला होणार होता. मात्र आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
आज सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत सुनावणी झाली असती तर, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबतचे चित्र देखील लगेच स्पष्ट झाले असते.
COMMENTS