माझी आई लोकांच्या घरी काम करायची तेव्हा मी दाराजवळ बसायची. ती शौचालये साफ करायची.
मुंबई / नगर सह्याद्री -
लाफ्टर क्वीन या नावाने प्रसिद्ध असलेली कॉमेडियन भारती सिंघ आज मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय नाव आहे. पण एक काळ असा होता जेव्हा ती खूप गरीब होती. पण आज ती एक आलिशान जीवन जगत आहे आणि भरपूर पैसेही कमवत आहे. पण एका काळी भारती सिंघ आणि तिच्या कुटुंबाला खूप गरिबीचा सामना करावा लागला. असे दिवस पहिले होते जेव्हा आई उदरनिर्वाहासाठी शौचालये साफ करायची आणि लोकांच्या उरलेल्या जेवणाने कुटुंबाचे पोट भरायची. भारती सिंघने यापूर्वी एकदा सांगितले होते की, तिचे बालपण किती गरिबीत गेले. अभिनेत्री नीना गुप्ताच्या डिजिटल पॉडकास्ट शोमध्ये, भारतीने पुन्हा एकदा तिच्या गरिबीची व्यथा सांगून भावूक झाली.
भारती तिच्या बालपणीच्या दिवसांची आठवण करत सांगते की, जेव्हा ती फक्त २ वर्षांची होती तेव्हा तिचे वडील वारले. भाऊ आणि बहीण ब्लँकेटच्या कारखान्यात ब्लँकेट शिवायचे. आई घरोघरी काम करायची. त्याकाळी गरिबी इतकी होती की जेव्हा तिची आई घरोघरी काम करून उरलेले जेवण घरी आणायची तेव्हा ते त्यांच्यासाठी ताजे जेवण असायचे.
भारती सिंघ पुढे म्हणाली, 'मी किती गरिबी पाहिली आहे याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. खाल्ल्यानंतर कोणी अर्धे सफरचंद फेकून देताना दिसले तर मला वाटायचे की ते अन्न वाया घालवत आहे म्हणून त्यांना श्राप मिळेल. मी कधी कधी फेकून दिलेले अर्धे सफरचंद उचलून खाण्याचा विचारही करायची. माझी आई लोकांच्या घरी काम करायची तेव्हा मी दाराजवळ बसायची. ती शौचालये साफ करायची. आम्ही निघायचो तेव्हा लोक आम्हाला उरलेले जेवण द्यायचे. आज मी माझ्या आईला सांगते की मी जे काही केले आहे आणि जे काही कमवले आहे ते तुझ्यामुळे आहे.
भारती सिंघचे नशीब 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'ने बदलले. पण इथे येण्यापूर्वी तिला कपिल शर्मा आणि सुदेश लाहिरी यांनी पहिली संधी दिली होती. भारती सिंघने सांगितले की, कॉलेजमध्ये एकदा ती बागेत विद्यार्थ्यांना हसवत होती तेव्हा सुदेश लाहिरीने तिला पाहिले. त्यानंतर त्यांनी शिक्षकांना एका जाडी मुलीला बोलावण्यास सांगितले जी विद्यार्थ्यांना हसवत आहे. तिथूनच भारती सिंगला संधी मिळाली. भारतीने पहिल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात परफॉर्म केले, ज्यासाठी ती टीमसोबत आंध्र प्रदेशला गेली होती. आज भारती सिंघ एक कॉमेडियनच नाही तर होस्ट आणि प्रोड्युसर देखील आहे.
COMMENTS