सीना नदी प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न: आ. संग्राम जगताप अहमदनगर | नगर सह्याद्री सीना नदीचे सुमारे १३ कि.मीचे पात्र नगर शहरांमधून जात आहे त्याम...
सीना नदी प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न: आ. संग्राम जगताप
अहमदनगर | नगर सह्याद्री
सीना नदीचे सुमारे १३ कि.मीचे पात्र नगर शहरांमधून जात आहे त्यामध्ये सांडपाणी व मैलमिश्रित पाणी सोडल्यामुळे पात्र प्रदूषित झाले आहे. आता अमृत भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून हे पाणी पाईपद्वारे वाकोडी परिसरातील शुद्धीकरण केंद्रावर जाणार आहे. त्यामुळे सीना नदी प्रदूषण मुक्त होईल नदीच्या सुशोभीकरण कामाच्या निधीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून कल्याण रोड हॅप्पी थॉट्स परिसरातील बंद पाईप गटार योजना कामाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रा.खासेराव शितोळे, युवा नेते युवराज शिंदे, भगवान काटे, पारुनाथ ढोकळे, अभय शेंडगे, ललित सांगळे, डॉ.अच्युत घुमरे, अमर गोंधळे, लक्ष्मण खोडदे, दादा आरवडे, हिरामण गुंड, पांडुरंग देवकर, दत्तात्रय कर्डिले, संतोष ढगे, अमोल भागवत, संदीप सोनवणे, संपत हिंगे, रोहित काळोखे, स्वप्नील घोरपडे, अतुल घोरपडे, प्रकाश मिश्रा, विशाल फुलारी, अंकुश कदम, अशोक कर्डिले, नितीन पवार, सुनील गुंजाळ, शिवाजी ढेरे, रामदास दाते, अमोल दाते, गंगाधर फुलारी, अशोक गांगर्डे, आबासाहेब कर्डिले, भाऊसाहेब शिंदे,अरविंद सूर्यवंशी, भास्कर मांडोळे आदी उपस्थित होते
युवराज शिंदे म्हणाले की, कल्याण रोड परिसराच्या रखडलेल्या विकासाला आमदार संग्राम जगताप यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने विविध विकास कामे सुरु आहेत.
पारुनाथ ढोकळे म्हणाले की, कल्याण रोड परिसराच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांनी टप्प्याटप्प्याने सर्वच भागाला निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे या परिसराच्या विकासला गती मिळाली आहे. त्यांच्या प्रयत्नातून कल्याण रोड परिसर हा भविष्यात स्वच्छ सुंदर विकसित उपनगर म्हणून ओळखले जाईल.यावेळी भगवानराव काटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले तर आभार हिरामण गुंड यांनी मानले.
COMMENTS