जूनियर एनटीआर ने पुढील कोणतेही चित्रपट साइन करणार नसल्याचे जाहीर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
अभिनेता ज्युनियर एनटीआरचा मोठा चाहता वर्ग आहे. ते कुठेही गेले तरी त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण याच दरम्यान जूनियर एनटीआरने एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. जूनियर एनटीआर ने पुढील कोणतेही चित्रपट साइन करणार नसल्याचे जाहीर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. याचे कारणही त्यांनी दिले आहे.
जूनियर एनटीआर सध्या त्याच्या 'एनटीआर ३०' चित्रपटामुळे चर्चेत आहे. कोरताला शिवा या चित्रपटाविषयी अधिकाधिक माहिती जाणून घेण्याची चाहत्यांना इच्छा आहे. यामुळे जूनियर एनटीआर चिंतीत आहे. नुकतेच त्यांनी सांगितले की, लोक जर असेच विचारत राहिले तर मी चित्रपट करणे सोडून देईल.
तथापि, ज्युनियर एनटीआरने ताबडतोब स्पष्ट केले की त्यांनी हे केवळ मस्करी मध्ये म्हटले आहे आणि सध्या चित्रपटांमध्ये काम करणे थांबवण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. जान्हवी कपूर 'एनटीआर ३०' मधून तेलुगुमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतेच ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपट '
आरआरआर' मधील 'नाचो-नाचों' गाण्याने ९५ अकादमी पुरस्कारांमध्ये ऑस्कर जिंकला आहे. या चित्रपटात जूनियर एनटीआरसोबत रामचरणही मुख्य भूमिकेत आहे.
ज्युनियर एनटीआरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ते एका कार्यक्रमात स्टेजवर जात असतांना, तेव्हा एक चाहता येऊन त्यांना मिठी मारतो. सुरक्षा रक्षकांनी लगेच त्या चाहत्याला बाहेर काढायला सुरुवात केली, परंतु ज्युनियर एनटीआरने रक्षकांना थांबवले आणि चाहत्यांसोबत फोटो काढले. ज्युनियर एनटीआरच्या या सौम्य वागण्याचे कौतुक होत आहे.
COMMENTS