अहमदनगर। नगर सहयाद्री - शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्री विजेच्या कडकट्यांसह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. रात्री सात वाजेच्या सुमारास व...
अहमदनगर। नगर सहयाद्री -
शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्री विजेच्या कडकट्यांसह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. रात्री सात वाजेच्या सुमारास वादळी वारा सुरू होताच अनेक भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुरुवारी (16 मार्च) ला रात्री विजेच्या कडकट्यांसह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वादळी वारा सुरू होताच अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता.
अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील मक्याचे पीक पूर्णपणे झोपले आहे. अवकाळी पावसामुळे बागेतील संत्री मोसंबी गळून पडली आहे. तर हातात आलेला गहू भिजला आहे. अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीस आला असतानाच नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे मात्र आता महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील नगर, पाथर्डी,शेवगाव, नेवासे, राहुर,पारनेर,कर्जत जामखेड, या तालुक्यांत काल रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.पावसाचे प्रमाण कमी असले तरी वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मक्याचे पीक पूर्णपणे झोपले आहे.
पावसामुळे रब्बी हंगामातील गव्हाचे क्षेत्र सरासरीपेक्षा अधिक वाढले असतानाच अवकाळी पावसाने या गव्हाच्या पिकावर घाला घातला आहे. अवकाळी व गारपिटीच्या पावसामुळे काढणीवर आलेला गहू भिजला आहे. उशिरा लागवड केलेल्या गव्हावर सर्वाधिक परिणाम या अवकाळी पावसाचा झाला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे मात्र महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रखडले आहेत. जिल्ह्यातील सर्वच महसूल कर्मचारी संपावर आहेत. तलाठी,मंडला अधिकारी हे महसूल विभागातील कर्मचारी संपावर असल्यामुळे हे पंचनामे कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
COMMENTS