परदेशी भूमीवर देशाबाबत केलेल्या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली / नगर सह्यद्री
राहुल गांधींचा पंतप्रधानांबद्दलचा द्वेष आता देशाबद्दल द्वेष झाला आहे. परदेशी भूमीवर देशाबाबत केलेल्या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या "भारताला गुलाम बनवण्याचा इतिहास असलेल्या देशाला भेट देऊन त्यांनी (राहुल गांधी) विदेशी शक्तींना आमंत्रण दिले. भारतातील लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करत विदेशी शक्ती भारतावर का हल्ला करत नाहीत, अशी खंत राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
स्मृती इराणी म्हणाल्या की, मला राहुल गांधींना विचारायचे आहे, तुम्ही परदेशात म्हणालात की तुम्हाला देशातील कोणत्याही विद्यापीठात बोलण्याचा अधिकार नाही. तसे असेल तर २०१६ मध्ये जेव्हा दिल्लीतील एका विद्यापीठात 'भारत तेरे टुकडे होंगे'चा नारा दिला होता, तेव्हा तुम्ही त्याचे समर्थन केले होते, ते काय होते?
राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासारख्या संस्थांचा अपमान केला. स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना विचारले, भारताचा अवमान करणे ही लोकशाही आहे का? सभागृह अध्यक्षांचा अपमान करणे ही लोकशाही आहे का? राहुल गांधींनी माफी मागावी अशी भारताची मागणी आहे.
COMMENTS