मुंबई । नगर सह्याद्री - गेल्या अनेक दिवसांपासून गौतमी पाटील डान्समुळे चर्चेत आहे. गौतमी पाटीलचे नृत्य हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. आता...
मुंबई । नगर सह्याद्री -
गेल्या अनेक दिवसांपासून गौतमी पाटील डान्समुळे चर्चेत आहे. गौतमी पाटीलचे नृत्य हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. आता मात्र तशी स्थिती राहिली नाही. अश्लील हावभाव केलेले व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकाशझोतात आली होती. त्यावेळी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र त्यानंतर गौतमीच्या करिअरचा ग्राफ वरवर जाताना दिसत आहे. सध्या तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओत तिने नक्की डान्स केलाय की, कब्बडी खेळली हेच कळत नाही असे चाहते म्हणत आहे.
राज्यातील कानाकोपऱ्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होत असतात. गौतमीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी होताना दिसते. गौतमीच्या चाहत्यांकडून कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केली जाते. आता तिचा चाहतावर्ग हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात ही आहे.
खेड्यापाड्यातून तरुण मंडळी गौतमीच्या कार्यक्रमाला आवर्जुन हजेरी लावतात. गौतमीचे चाहते तिच्या नाचतानाचा क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आतूर असतात. गौतमीचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.
गौतमीचा नुकताच ‘तुम्हा बघून तोल माझा गेला’ गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. गौतमीच्या ‘तुम्हा बघून तोल माझा गेला’ या डान्सला तुफान पसंती मिळाली आहे. या गौतमीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
गौतमीच्या कार्यक्रमांबरोबरच तिच्या लावणीची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. गौतमीची लोकप्रियता व तिच्या गाण्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून मराठीतील प्रसिद्ध गायकाकडून गौतमीला गाण्याची ऑफर मिळाली आहे. गायक आनंद शिंदेचा भाऊ उत्कर्ष शिंदेच्या गाण्यात गौतमी झळकणार आहे.
उत्कर्ष शिंदेने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे. गौतमीबरोबरचे काही फोटो उत्कर्षने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहे. या फोटोला त्याने “अहो शेट लय दिसान झालीया भेट…ह्या माझ्या संगीतबद्ध केलेल्या सुपरहिट लावणीनंतर ह्यावर्षी लवकरच तुम्हा सर्वांसाठी…माझं नवं लिखाण नवं संगीत नव्या गायकेसोबत खूप साऱ्या नवीन लावण्या घेऊन येणार…लवकरच”, असं कॅप्शन उत्कर्षने या फोटोला दिले आहे.
COMMENTS