ऑस्कर २०२३ मध्ये कोणत्या चित्रपटाने यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वाधिक पुरस्कार पटकावले तसेच, कोणत्या चित्रपटाने श्रेणीत यश मिळवले याची यादी पाहूया.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
ऑस्कर २०२३ च्या विजेत्यांची यादी समोर आली आहे. ९५ व्या अकादमी पुरस्कारांच्या प्रत्येक श्रेणीला त्यांचे विजेते सापडले आहेत. ऑस्कर २०२३ मध्ये भारतानेही आपला ठसा उमटवला आहे. कोणत्या चित्रपटाने यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वाधिक पुरस्कार पटकावले तसेच, कोणत्या चित्रपटाने श्रेणीत यश मिळवले याची यादी पाहूया.
१. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : के हुई क्वान
'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' ने 'ऑस्कर २०२३ मध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहेत. के हुई क्वान यांनी ९५व्या अकादमी पुरस्कारांमध्ये प्रथम सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला.
२. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: जेमी ली कर्टिस
'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'च्या जेमी ली कर्टिस यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर २०२३ जिंकला आहे. जेमी यांनी अँजेला बॅसेट (ब्लैक पैंथर: वकंडा फॉरेव्हर), हाँग चाऊ (द व्हेल), केरी कॉन्डोन (द बॅन्शीज ऑफ इनिशरीन) यांना मागे सोडले.
३. सर्वोत्कृष्ट लेखन (मूळ पटकथा)
डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट यांना 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' या चित्रपटाशीच्या मूळ पटकथेसाठी सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळाला.
४. बेस्ट लीड एक्ट्रेस : मिशेह योह
मिशेल योहला 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'साठी सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
५. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट
डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट यांना 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. याचबरोबर डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट यांनी या विजयासह स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा पराभव केला आहे.
६. सर्वोत्तम चित्रपट
सर्वोत्कृष्ट चित्रासाठी ऑस्कर पुरस्कार २०२३ देखील 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'ला मिळाला आहे. यासह डॅनियल क्वान, डॅनियल शीन आणि जोनाथन वांग (निर्माते) यांनी मोठा विजय मिळवला आहे.
७. सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन
सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादनासाठीचा ऑस्करही 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'ला मिळाला आहे. यासाठी पॉल रॉजर्स यांना सन्मानित करण्यात आले आहे.
COMMENTS