मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल क...
मुंबई / नगर सह्याद्री -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. वाजीद रजाक सय्यद यांनी ही तक्रार दाखल केली असून राज ठाकरे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडव्यानिर्मित्त मुंबईच्या शिवतीर्थावर मेळावा घेतला आहे. या मेळाव्यात त्यांनी राज्यातील मस्जिदीवरील भोग्यांच्या प्रकरणावर पुन्हा बोट ठेवले आहे. मागील काही दिवसांपासून मस्जिदीवरील भोग्यांचा आवाज पुन्हा वाढला आहे. गेल्या गुढी पाडव्याला मी सांगितले होते. मशिदीवरील भोंगे बंद करा, त्यावरून गेल्या सरकारमध्ये माझ्या मनसैनिकांवर १७ हजार गुन्हे दाखल झाले, ते मागे घ्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी सरकारला केले होते.
दुसरे एक तर तुम्ही मशिदींवरील भोंगे बंद करण्यास सांगा किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करा, दोनपैकी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. आम्ही स्पीकर बंद करू, मी मुद्दाम यासाठी मुख्यमंत्री यांना भेटणार आहे. राज्यात अनधिकृतपणे काही गोष्टी उभ्या राहत आहेत त्याकडे लक्ष द्या, असे सांगणार आहे. अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशाराही दिला होता.
मला जावेद अख्तर यांच्यासारखे मुसलमान पाहिजेत. त्यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांनाच झोडपले. त्यांच्या लोकांमध्ये जाऊन त्यांना सुनावले आहे. अशी माणसे मला हवी आहे.
राज ठाकरे यांनी केलेला भाषणामुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार वाजीद रजाक सय्यद नामक व्यक्तीने पिंपरी चिंचवड येथील वाकड पोलिस स्टेशनमध्ये केली आहे.
COMMENTS