सतीश कौशिक यांचे ८ मार्च रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी त्यांचे मित्र अनुपम खेर यांनी ९ मार्चला सकाळी ट्विट करून दिली.
मुंबई / नगर सह्याद्री -
बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक आता या जगात नाहीत. बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांचे जवळचे मित्र, अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची पुष्टी केली. या बातमीनंतर संपूर्ण इंडस्ट्री शोककळा पसरलाय आहे. त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी, सतीश कौशीश यांनी ट्विटरवर होळीचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ते बॉलिवूड स्टार्ससोबत होळीचा आनंद लुटताना दिसत होते. यासोबतच त्यांनी आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.
७ मार्च रोजी सतीश कौशिक यांनी होळीचा फोटो ट्विटरवर शेअर करत सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. सतीश कौशिक यांनी जुहू येथील जानकी कुटीर येथे होळी पार्टीत सहभागी झाले होते. या पार्टीत त्यांच्यासोबत जावेद अख्तर, बाबा आझमी, शबाना आझमी, अली फजल आणि रिचा चढ्ढा देखील उपस्थित होते. सतीश यांनी हे फोटो ट्विट करून लिहिले, 'रंगीत आणि मजेदार होळी. नवविवाहित जोडप्याला (अली फजल आणि रिचा चढ्ढा) भेटा. सर्वांना होळीच्या शुभेच्छा. सतीश कौशिक यांच्या या शेवटच्या ट्विटवर सोशल मीडिया युजर्सही दु:ख व्यक्त करत आहेत. होळीच्या दिवशी सतीश कौशिक यांनी केलेले ट्विट हे त्यांचे शेवटचे ट्विट असेल याची कुणालाही कल्पना नव्हती.
सतीश कौशिक यांचे ८ मार्च रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी त्यांचे मित्र अनुपम खेर यांनी ९ मार्चला सकाळी ट्विट करून दिली. सतीश कौशिक आता कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटात शेवटचे ऑनस्क्रीन दिसणार आहे. अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर दिवंगत सतीश कौशिक यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
सतीश यांनी शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि अनेकांचे दिग्दर्शनही केले, सतीश कौशिक एक विनोदी अभिनेता म्हणून ओळखले जात होते, ज्यामध्ये मिस्टर इंडिया मधील कॅलेंडर ही त्यांची सर्वात अविस्मरणीय भूमिका होती.
COMMENTS