हिंगोली / नगर सहयाद्री - हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सेलू येथे ही घटना घडली आहे. वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीचे वार करून पोटच्या मु...
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सेलू येथे ही घटना घडली आहे. वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीचे वार करून पोटच्या मुलानेच खून केला. हा प्रकार लपवण्यासाठी अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना पोलिस घरी धडकले अन् सर्व प्रकार उघड झाला.पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, सेलू येथील भाऊराव पांडुरग कबले हे कुटुंबीयांसह राहतात. कबले दाम्पत्य रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतम्ह होते.दरम्यान, सोमवारी सायंकाळपासून भाऊराव व मुलात वाद सुरू होता. या वादामध्ये मुलाच्या आईने मध्यस्थी करत मिटवल होत. त्यानंतर रात्री वडिलांनी मुलास रागावण्यास सुरुवात केली. संतापलेल्या मुलाने वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार केला. यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर घरातील कुटुंब घाबरून गेले होते. परंतु ही घटना घराबाहेर कळाल्यास त्याचे परिणाम वाईट होतील. या भीतीपोटी त्यांनी कुठेही वाच्यता न करता रात्रभर जागून काढली. सकाळच्या सुमारास कुटुंबीयांनी अंत्यविधींसाठीलागणारे सामान हार-फुले आणत अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती. परंतु या घटनेची माहिती पोलीसाना प्राप्त झाल्यामुळे तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची पाहणी करत असताना गजानन कबले यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार दिसून आले.
कुटुंबीयांना चांगलाच घाम फुटला. यावेळी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मुलाने वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. तसेच खुनाची माहिती पोलिसांना व इतरांना दिल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
COMMENTS