पारनेर | नगर सह्याद्री- महाराष्ट्रातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांना सरकारने १९८२ ची जुनी पेन्शन योजना नाकारून नवीन पेन्शन योजना ला...
पारनेर | नगर सह्याद्री-
महाराष्ट्रातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांना सरकारने १९८२ ची जुनी पेन्शन योजना नाकारून नवीन पेन्शन योजना लागू केल्याच्या निषेधार्थ संपाच्या तिसर्या दिवशी पारनेर तालुका जुनी पेन्शन समन्वय संघातर्फे तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शिक्षक नेते प्रविण ठुबे यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
यावेळी ठुबे म्हणाले, एनपीएस योजना शेअर मार्केटवर आधारित असून त्याद्वारे कर्मचार्यांचे हित साधले जात नाही. सेवेत असताना कर्मचार्यांचा मृत्यू झाल्यास पाहिजे तेवढ्या प्रमाणात पेन्शन उपलब्ध होत नाही.त्यामुळे कर्मचार्यांचे आयुष्य बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. यावेळी पारनेर तालुयातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांबरोबरच जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, महसूल, तहसील कार्यालय, कृषी विभाग, शासकीय तंत्रनिकेतन, आयटीआयचे कर्मचारी सहभागी झाले होते.
शिक्षक नेते प्रवीण ठुबे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जुनी पेन्शन मिळावी म्हणून संपात अन्नत्याग केला. वैयक्तिक त्यांना जुनी पेन्शन योजना लागू असताना देखील त्यांनी केलेल्या या आंदोलनाचे तालुयातील सर्व जुनी पेन्शन समन्वयकांच्या वतीने आभार मानण्यात आले. त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचे सर्वांनी कौतुक केले.गटविकास अधिकारी किशोर माने यांच्या हस्ते जलपान देवुन ठुबे यांनी उपोषन सोडले.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष कैलास साठे, राजेंद्र वाघ ,शिक्षक नेते रा.या.औटी, पांडुरंग खोडदे, भगवान रसाळ, शिक्षक नेते प्रवीण ठुबे, सूर्यकांत काळे, शिक्षक बँकेचे संचालक कारभारी बाबर, शिक्षक नेते संभाजी औटी, अमोल साळवे, संतोष ठाणगे, आबासाहेब गायकवाड, कानिफ गायकवाड, सोपान गवते, संतोष खोडदे, संदीप शिंदे, भगवान राऊत, अमोल ठाणगे, गौतम साळवे, बाबासाहेब धरम, चंद्रकांत मोढवे, चंद्रकांत गट, संतोष खामकर, प्रवीण साळवे, बबन दरेकर, सतीश भालेकर, भास्कर ठाणगे, मारुती जोरी, विजय पठारे, भगवान राऊत, सुदाम दळवी, रवींद्र दातीर, प्रशांत ठुबे, शंभू दुधाडे, संदीप गायकवाड, अमोल रेपाळे, अरुण पठारे, संजय जाधव, भूषण चौधरी, आदी उपस्थित होते.
COMMENTS