अहमदनगर | नगर सह्याद्री- आचार्यसम्राट पू. आनंदऋषीजी यांच्या शिकवणुकीप्रमाणे कार्यरत असलेले आणि कार्यामधून सर्वांना आनंद देत नव-नवे आदर्श उभे...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
आचार्यसम्राट पू. आनंदऋषीजी यांच्या शिकवणुकीप्रमाणे कार्यरत असलेले आणि कार्यामधून सर्वांना आनंद देत नव-नवे आदर्श उभे करणारे जय आनंद महावीर युवक मंडळ नेहमीच शहरात कौतुकाचा विषय राहिले आहे, असे गौरवोद्गार मर्चंटस् बॅकेचे चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांनी काढले.
मर्चंटस् बॅकेच्या चेअरमनपदी हस्तीमल मुनोत यांची व व्हाईस चेअरमनपदी अमित मुथा यांची एकमताने निवड झाल्याबद्दल जय आनंद महावीर युवक मंडळाने बॅकेत जावून या दोघांचा सत्कार केला असता ते बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत व सेक्रेटरी आनंद मुथा यांच्या हस्ते मोत्यांच्या मण्यांचा हार व शाल देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मर्चंटस् बॅकेच्या विद्यमान संचालक मंडळासह जय आनंद महावीर युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांनी जय आनंद महावीर युवक मंडळाच्या कार्यातील सिंहाचा वाटा मंडळाचे मार्गदर्शक हस्तीमलजी मुनोत यांचाच आहे. मंडळातर्फे राबवण्यात येणारे सर्व उपक्रमांमागे त्यांचीच प्रेरणा असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह कायम वृध्दींगत होत राहतो, असे सांगितले. मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा यांनी हस्तीमलजी मुनोत यांचा सदैव कृतीशील रहाण्याचा आदर्श आम्हा सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच प्रोत्साहित करतो म्हणूनच बॅकेत येवून मंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार केला, असे सांगितले.मर्चंटस् बॅकेचे नूतन व्हाईस चेअरमन अमित मुथा यांनी मंडळाने केलेल्या सत्काराने भारावून गेलो, अशा शब्दात मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.
COMMENTS