मुंबई | नगर सह्याद्री- अवकाळीपासून काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र असतानाच राज्यात पुन्हा वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. त्यामुळे बळीराज...
मुंबई | नगर सह्याद्री-
अवकाळीपासून काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र असतानाच राज्यात पुन्हा वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.
गुरुवारी (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलया पावसाची शयता आहे. शुक्रवारपासून या भागांमध्ये विजा, मेघगर्जना, वादळी वार्यासह पावसाची शयता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात अनपेक्षित बदल होत आहे. तापमान, बाष्प, ढगांची गर्दी व कमी हवेचा दाब निर्माण होईल तेथे विजांच्या कडकडाटासहपावसाची शयता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उद्या सकाळी ऊन व दुपारनंतर आकाशात ढग घोंगावतील. विशेष करुन विदर्भात अवकाळी पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे तेथे पुढील आठ दिवस काही भागात पावसाची शयता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभी पिके आडवी झाली आहेत. एकट्या महाराष्ट्रात १.३९ लाख हेटरवरील पिके आडवी झाली.
अधिवेशनात मदत जाहीर होण्याची शयता
राज्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे सुरुवातीला १३ हजार हेटर, नंतर ४० हजार हेटर व आता सुमारे १ लाख ३९ हजार हेटरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकर्यांना मदत जाहीर होण्याची शयताही त्यांनी व्यक्त केली.
COMMENTS